Page Nav

HIDE
Wednesday, July 9

Pages

Subscribe Us

Advertisment

मोठा वाघोद्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला. गॅस्ट्रोप्रमाणे डेंग्यू मलेरियाची साथ पसरण्याची शक्यता?

  मोठा वाघोद्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला. गॅस्ट्रोप्रमाणे डेंग्यू मलेरियाची साथ पसरण्याची शक्यता? ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाने उपाययोजना...

 मोठा वाघोद्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला. गॅस्ट्रोप्रमाणे डेंग्यू मलेरियाची साथ पसरण्याची शक्यता?

ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाने उपाययोजना करणार का? 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मोठा वाघोदा येथे डासांचा प्रादुर्भाव वाढला धूर धुरळणीची आवश्यकता डेंग्यू मलेरिया सदृश आजारांचे प्रमाण वाढले रुग्ण संख्येत जास्त प्रमाणात लहान मुलांचा समावेश  आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेण्याची गरज. मोठा वाघोदा या ८ते९ हजार लोकसंख्या असलेल्या गावातील मध्यभागातून असलेल्या लेंडीनाला व त्यामध्ये साचलेले गाळ गढूळ पाणी व गावातील गटारींचे सांडपाणी यामुळे नाल्यात साचलेले दुर्गंधीयुक्त सांडपाणी गाळ व वाढलेल्या गवतामुळे प्रचंड प्रमाणातील उत्पत्ती झालेल्या डासांचा  प्रादुर्भाव अतिप्रमाणात वाढला आहे याच डासांच्या प्रादुर्भावाने गावात डेंग्यू मलेरिया सदृश आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत व डेंग्यू मलेरिया तापाने संक्रमित रुग्ण खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेत असल्याचे दिसून येते दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे तरी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने डासांची उत्पत्ती कमी करण्यासाठी व डास निर्मुलनासाठी धूर धुरळणी करणे आवश्यक आहे मागील वर्षी गढूळ पाणी पुरवठा केला गेल्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाली होती आणि शेकडो रुग्ण बाधित झाले होते याच धर्तीवर मोठा वाघोदा गावात डासांच्या प्रादुर्भावाने डेंग्यू मलेरिया सदृश आजाराची साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी तत्पुर्वीच आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गावात डास निर्मुलनासाठी धूर धुरळणी तसेच गटारीवर औषध फवारणी करावी आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जाते आहे

No comments