बसपा ची चोपडा विधानसभा कार्यकारणी गठीत चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) बहुजन समाज पाटीॅ च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एड. ...
बसपा ची चोपडा विधानसभा कार्यकारणी गठीत
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बहुजन समाज पाटीॅ च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एड. सुनिलजी डोंगरे साहेब यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हा अध्यक्ष भीमराव आनंदा खैरे आणि जळगाव जिल्हा महासचिव सचिन अशोक बाविस्कर यांच्या मार्फत आज दिनांक 29/04/2025 रोजी चोपडा विधानसभेची नवनिर्वाचित कमेटी जाहीर करण्यात आली. ह्या वेळेस जिल्हाध्यक्षांनी मार्गदर्शन करत असतांना प्रतिपादन केले की , बहुजन समाज पाटीॅ हि तथागत बुध्द , सम्राट आशोक, संत कबीर ,संत रविदास , छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, छत्रपती शाहूजी महाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, व मान्यवर कांशीराम साहेब यांच्या विचारांची एकमेव वारसदार व भारताची तिसर्या क्रमांकांची राष्ट्रीय पाटीॅ आहे, व ह्या राष्ट्रीय पाटीॅची जबाबदारी तुम्हाला मिळाली आहे. ही अतिशय आंनदाची व गौरवाची बाब आहे ही जबाबदारी तुम्ही अतिशय प्रमाणीक पणाने पार पाडणार अशी आशा व अपेक्षा ठेवतो व तुम्हाला शुभेच्छा व तुमचं अभिनंदन उपस्थितीत मान्यवरांच्या वतीने करतो ,
कार्यकारणी पुढील प्रमाणे गठीत करण्यात आली ती अशी भाईदास दामू बाविस्कर -चोपडा विधानसभा प्रभारी, श्रीकांत सजन सैंदाने -चोपडा विधानसभाध्यक्ष, विजय दयाराम मोरे- चोपडा विधानसभा उपाध्यक्ष, विठ्ठल भालचंद्र पाटील ( शिंदे ) - चोपडा विधानसभा महासचिव, मिलिंद बापुराव सोनवणे- चोपडा विधानसभा सचिव, तुषार रविंद्र सिरसाट- चोपडा विधानसभा बीव्हीफ संयोजक चोपडा शहर अध्यक्ष- वसंंत युवराज वाल्हे.अशा प्रकारची नवनिर्वाचित विधानसभेची कार्यकारणी बनविण्यात आली . तसेच ह्यावेळेस प्रताप भार्डू सोय, राकेश मधुकर शिरसाठ , समाधान वानखेडे, जगदीश भालेराव , इत्यादी कार्यकर्ता उपस्थित होते.
No comments