रावेर तालुक्यातील तीन ठिकाणी अपघात दोन ठार पाच जखमी रा वेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खिरोदा पाल घाटात अपघात अज्...
रावेर तालुक्यातील तीन ठिकाणी अपघात दोन ठार पाच जखमी
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खिरोदा पाल घाटात अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेने पिता-पुत्र ठार
रावेर तालुक्यातील खिरोदा पाल घाट रस्त्यावरील दि २७एप्रिल रोजी रात्री ८:३० वाफेच्या सुमारास अज्ञात चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकीत अपघातात पाल तालुका रावेर येथील रहिवासी पिता-पुत्र जागीच ठार झाले तर आदीसह दुसरा मुलगा दोघे जखमी झाले.अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकने पिंट्या मोहन भिलाला (३५, रा.पाल) व रितीक पिंट्या भिलाला (४) हे पिता-पुत्र ठार झाले. पिंट्या यांची पत्नी पूजा (३०) व दुसरा मुलगा रोशन पिंट्या भिलाला हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.अपघातानंतर वाहन चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन करीत जंगलात पसार झाला. पिंट्या भिलाला हा गवंडी कामासाठी भूसावळ येथे राहत होता. पाल येथे परत येत असतांना हा अपघात झाला. या प्रकरणी सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर
रावेर तालुक्यात अंकलेश्वर -बुऱ्हानपूर राष्ट्रीय महामार्गावर बिंबे पेट्रोल पंप समोर
भरधाव वेगातील राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने मोटार सायकलला जबर धडक दिल्याने तांदलवाडी येथील
विजय तुकाराम पाटील (५३) व सार्थक विजय पाटील (२०) (दोन्ही, रा. तांदलवाडी) हे त्यांच्या दुचाकीत पेट्रोल रून सावदा रोडवरील बिंबे भरून पेट्रोलपंपाच्या बाहेर येत बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर येताच जळगावकडून रावेरकडे भरधाव वेगाने आलेल्या एसटी बसने जबर धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले
कारची दुचाकीला धडक
रावेर सावदा रस्त्यावर विवरे गावाजवळ मध्य प्रदेशातून दुचाकीवर मजूर हातमजुरीसाठी रावेर विवरा येथे येत असताना सावदाहून रावेरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात कारचालकाने त्या मजुरांच्या मोटारसायकलला कट मारल्यामुळे दुचाकीवर मागे बसलेला विकास जुमरे (वय २१, रा. मालखेडा, ता. भगवानपुरा जि. खरगोन म. प्र) याच्या डाव्या पायाला व हाताच्या पंजाला फ्रॅक्चर होऊन दुखापत होऊन गंभीर जखमी झाला त्यास रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता दोघं अपघातग्रस्तांवर रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी चौधरी यांनी तातडीने औषधोपचार केले.
No comments