ईश्वर अल्लाह एकच आहे म्हणून सर्वांनी जातीभेद न करता आपसात प्रेमाने राहावे :- प्राध्यापक वाजीद अली खान इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमका...
ईश्वर अल्लाह एकच आहे म्हणून सर्वांनी जातीभेद न करता आपसात प्रेमाने राहावे :- प्राध्यापक वाजीद अली खान
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथे आज १३ एप्रिल (रविवार) जमाते इस्लामी हिंद शाखा फैजपुर तर्फे महात्मा गांधी बहुउद्देशीय हॉल येथे सद्भावना ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले... कार्यक्रमाची सुरुवात कुरान पठण ने झाली व मराठी अनुवाद इरफान सर यांनी वाचन केले. अमिरे मुकामी अब्दुल रउफ जनाब यांनी आपले प्रारंभिक शब्दात सांगितले की सद्भवणा ईद मिलन कार्येक्रम आयोजनकरण्याचे उद्देश हे आहे की आपसात हिन्दू मुस्लिम भाईचारा वाढवा आपसात प्रेम सद्भावना निर्माण हुआवा व एकमेकांचे विचारांचा आदान प्रदान हुवावा हे आहेत. तसेच एकमेकांब्दल असलेले गैर समज दूर हुवावे.
या कार्येक्रम चे प्रमुख वक्ते प्रोफेसर श्री वाजीद अली खान (नाशिक) हे होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की सर्व मानव एकच माता पिता ची संतान आहेत तरी आपण सर्व एक मेकांचे बांधव होत.व आपला सर्वांचा ईश्वर अल्लाह एकच आहे म्हणुन सर्वांनी कोणता जाती भेद न करता आपसात प्रेमाने रहावे व एकमेकांना सहकार्य करावे.आपले भाषणात श्री वाजीद अली खान यांनी रमझान, रोजा, ईद व कुरान चे काय महोत्व आहे ते सांगितले त्यांनी सांगितले कुरान हे फक्त मुस्लिमांचा धर्म ग्रंथ न्हवे तर सर्व मानव जाती साठी मार्गदर्शक आहे.तसेच माजी आमदार श्री शिरिष दादा चौधरी श्री पांडूरंग सराफ, श्री हेमराज चौधरी, श्री केतन भाउ कीरंगे, श्री, विष्णु भाऊ नारखेडे, श्री पी के चौधरी साहेब, श्री मिलिंद वाघुळदे, पोलिस निरीक्षक मोताळे साहेब, आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाक्टर इमरान शेख यांनी केले तसेच आभार ही व्यक्त केले. कार्येक्रम यशस्वी करण्यासाठी जमाते इस्लामी फैजपूर चे सर्व सदस्य ,महीला विंग MPJ युथ विंग एस आई ओ व युवा ग्रुप पठाण वाडी यांनी परिश्रम घेतले.

No comments