adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लासूर येथिल लखीचंद ठाकरे सेवानिवृत्त

  लासूर येथिल लखीचंद ठाकरे सेवानिवृत्त लासुर ता.चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लासूर ता‌.चोपडा(दि.२७) येथिल रहिवाशी लखिचंद लाल...

 लासूर येथिल लखीचंद ठाकरे सेवानिवृत्त


लासुर ता.चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लासूर ता‌.चोपडा(दि.२७) येथिल रहिवाशी लखिचंद लालचंद ठाकरे हे सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली संचलित माध्यमिक विद्यालय पोयंजे या विद्यालयातून आपल्या 31 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून सेवा निवृत्त झाले आहे त्यांच्या सेवापुर्ती सोहळा कोकण विभागाचे शिक्षक आमदार डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.लखिचंद ठाकरे यांच्या सेवेची सुरवात1993 साली शिक्षक पदी कोलाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथून झाली‌.त्यानंतर 1996 ला त्यांना उपमुख्याध्यापक म्हणून ग‌.बा‌.वडेर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे पदोन्नती मिळाली 1999 मध्ये आत्मोन्नती विद्यामंदिर जांभूळपाडा येथे मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली व 2001 मध्ये उच्च माध्यमिक विद्यालय सुरू झाल्याने त्यांची प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली सलग 24 वर्ष प्राचार्य म्हणून सेवा देवून ते सेवानिवृत्त झाले त्यांच्या या यशात लासूर येथिल जावयी श्रावण शिवराम महाजन तसेच गोकुळ महाजन यांचे श्रेय असल्याची भावना लखिचंद ठाकरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली त्यांची पुर्ण सेवा सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली येथे झाली

No comments