श्री विश्वकर्मा सुतार समाज विकास मंडळ मुक्ताईनगरची नवीन कार्यकारिणी गठित मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श...
श्री विश्वकर्मा सुतार समाज विकास मंडळ मुक्ताईनगरची नवीन कार्यकारिणी गठित
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्री विश्वकर्मा सुतार समाज विकास मंडळ, मुक्ताईनगर च्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सन १९९७ पासून कार्यरत असलेली जुनी कार्यकारिणी बरखास्त करून धर्मदाय आयुक्त कार्यालय जळगाव यांच्या नियमानुसार मंडळाच्या आजीव सभासदांमधून संविधानिक पद्धतीने सर्वानुमते सन २०२४ ते २०२९ ची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. मागील कार्यकारी मंडळाने सन १९९७ पासून ते सन २०२४ पर्यंतचे सर्व ऑडिट रिपोर्ट व चेंज रिपोर्ट पारदर्शकपणे धर्मदाय आयुक्त कार्यालय जळगाव यांचेकडून मंजूर करून घेतलेले आहे. त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारची तक्रार किंवा याचिका दाखल झालेली नाही. त्यांनी कार्यभार यथोचितरित्या पूर्ण केलेला असून नवीन कार्यकारिणीला मन:पूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत.
नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे -
१.श्री.विजय प्रल्हाद खराटे - अध्यक्ष
२.श्री.संजीव हरिश्चंद्र बुंदेलकर - उपाध्यक्ष
३.श्री.संजय पांडुरंग अंदुरकर - कोषाध्यक्ष
४.श्री.श्यामकांत काशिनाथ रुले - सचिव
५.श्री.गजानन मगन तुळसकर - सहसचिव
६.श्री.भिकन रामदास सूर्यवंशी - सदस्य
७.श्री.सुधाकर भास्कर बोरेकर - सदस्य
८.श्री.मनोज पांडुरंग लुले - सदस्य
९.श्री.राजू तुळशीराम गणुरकर - सदस्य
१०.श्री.संदीप शांताराम दांडगे - सदस्य
११.श्री.मनोज नथु लुल्हे - सदस्य
प्रसंगी जून्या कार्यकारिणीतील सर्व सदस्य आणि बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

No comments