adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका ग्रामीण पूर्व अध्यक्ष पदी पिंटू पावरा यांची निवड

  भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका ग्रामीण पूर्व अध्यक्ष पदी पिंटू पावरा यांची निवड  चोपडा प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड)       चोपडा ता...

 भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका ग्रामीण पूर्व अध्यक्ष पदी पिंटू पावरा यांची निवड 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक हेमकांत गायकवाड)

      चोपडा तालुक्यातील मालापूर येथील  रहिवासी पिंटू गुलसिंग पावरा यांना भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका अध्यक्ष पदी निवडी बद्दल आदिवासी समाजामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले त्यात पिंटू भाऊ यांनी अध्यक्ष म्हणून निवड झाल्या नंतर सर्व आदिवासी समाज कडून पक्ष श्रेष्टीचा आभार मानले की आदिवासी समाजाला एका राष्ट्रीय पक्षाने पहिल्यांदा अध्यक्ष पद दिले आहे पिंटू पावरा हे अगदी विद्यार्थी दशे पासून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांनी अनुसूचित जनजाती प्रकल्प भारतीय जनता पार्टी या प्रकल्पात सलग आठ वर्षं दिलेली जबादारी स्वीकारून या प्रकल्पाद्वारे आदिवासी लोकांना विविध शासकीय योजना मिळवून दिल्या त्यामुळे धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगांव जिल्ह्यातील आदिवासी लोकांचा मोठा संपर्क वाढत गेला आणि भारतीय जनता पार्टीने पुढे त्यांना अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश सदस्य व नंतर अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश चिटणीस या सारख्या जबाबदाऱ्या दिल्या व प्रामाणिक पणे स्वीकारून काम केले आणि त्या कामाची पावती म्हणून पक्षाने अध्यक्ष पद दिले पिंटू पावरा यांनी आदिवासी समाजाची स्ववाद साधतांना हे म्हटले आहे की भारतीय जनता पार्टी ही सर्व सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारी पार्टी आहे या पार्टीत शिस्तीने काम केले तर सर्व सामान्य वंचित आदिवासी कार्यकर्ते पूढे जातील देशाचे राष्ट्रपती दृवपदी मुर्मु देखील आदिवासी समाजातून आहे म्हूणून आपण सर्व जण भारतीय जनता पार्टीचे सदस्य व्हावे असा संदेश लोकांना दिला 

     या अध्यक्ष पदाचा निवडी बद्दल राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग अध्यक्ष अत्तरसिंह आर्य,आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजयजी सावकारे,आमदार राजुमामा भोळे आमदार अमोल जवळे आमदार आमदार मंगेश चौहान खासदार स्मिताताई वाघ  व सर्व जिल्ह्यातील तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांनी व आदिवासी बांधवांनी प्रत्यक्ष भेटून किंवा  मोबाईल द्वारे शुभेच्छा दिल्या

No comments