adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वेळोदे जि प मराठी शाळा येथील लहान बालकांचे आरोग्याचा प्रश्न ? एकीकडे तंबाखूजन्य पदार्थ तर दुसरीकडे वारंवार जळालेले तेलाच्या धूर

वेळोदे जि प मराठी शाळा येथील लहान बालकांचे आरोग्याचा प्रश्न ? एकीकडे तंबाखूजन्य पदार्थ तर दुसरीकडे वारंवार जळालेल्या तेलाचा धूर  गलंगी ता. च...

वेळोदे जि प मराठी शाळा येथील लहान बालकांचे आरोग्याचा प्रश्न ?

एकीकडे तंबाखूजन्य पदार्थ तर दुसरीकडे वारंवार जळालेल्या तेलाचा धूर 


गलंगी ता. चोपडा मच्छिंद्र रायसिंग 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

गलंगी तालुका चोपडा येथुन जवळच असलेल्या वेळोदे  येथील जिल्हा परिषद मराठी शाळा असून या शाळेत 154 विद्यार्थी संख्या असून अंगणवाडीतील बालकांची संख्या 80 इतकी असून त्यांचे वय फक्त एक ते पाच वर्षे पर्यंत असून या विद्यार्थ्यांना रोजच आपल्या शाळेच्या गेट जवळ कसरत करून जावे लागते. शाळेच्या गेट जवळच एका बाजूला भजी पोहे नाश्ताचे  हॉटेल असून वारंवार जळालेल्या तेलाचा व लाकडांचा धूर निघत असतो. तर दुसरीकडे शाळेच्या आवारातील वाल कंपाऊंडच्या गेट जवळ तंबाखूजन्य गुटखा विमल पान मसाला यासारख्या तंबाखूजन्य पदार्थाची सर्रास विक्री होत आहे ही बाब केवळ चिंताजनक नाहीतर कायद्याचे ही सरळ सरळ उल्लंघन करणारी आहे. शाळेच्या गेट जवळच मेन रस्ता असल्यामुळे लहान बालकांना नाश्ता साठी किंवा तंबाखूजन्य पदार्थ घेण्यासाठी आपले वाहन टू व्हीलर किंवा फोर व्हीलर हे शाळेच्या गेट जवळ  बिनधास्तपणे उभे करत असतात. यामुळे लहान विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून त्या वाहनांना पार करूनच जावे लागते. भारतीय कायद्यानुसार कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री बेकायदेशीर आहे. मात्र या नियमांकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. 

वैद्यकीय तज्ञांच्या मते लहान वयात तंबाखूजन्य पदार्थ वापरणे हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करणारी आहे शाळेच्या गेट जवळच तंबाखूजन्य पदार्थ असल्यामुळे व्यसनाधीन होणाऱ्यांची संख्या  वाढण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. शासनाने व संबंधित विभागाने जातीने लक्ष देऊन सदरील प्रकार बंद करण्यात यावे अशी मागणी वेळोदे येथील पालक वर्ग व सुज्ञ नागरिक व सामाजिक कार्यकर्ता दंगल पोपट करणकाळे राहणार वेळोदे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन ग्रामपंचायत व शाळेतील मुख्याध्यापक यांना अर्ज देऊन विनंती केली आहे. शाळा परिसर हा विद्यार्थी घडवण्याचे ठिकाण आहे. अशा ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाची विक्री ही गंभीर बाब असून यावर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे. असे सुज्ञ नागरिकांच्या व पालकांच्या चर्चेच्या विषय दिसून येत आहे.

No comments