adds

Page Nav

HIDE
Monday, July 21

Pages

Subscribe Us

Advertisment

यावल येथे सेवा हक्क दिनानिमित्त बिबटया हल्ल्यात मरण पावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना आमदारांच्या हस्ते पन्नास लाखाची

 यावल येथे सेवा हक्क दिनानिमित्त बिबटया हल्ल्यात मरण पावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना आमदारांच्या हस्ते पन्नास लाखाची 


शब्बीर खान यावल प्रतिनिधी

(संपादक हेमकांत गायकवाड)

यावल (दि२८ ) तालुक्यातील मागील दोन महीन्यात मनवेल आणी डांभुर्णी या दोन ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन चिमूकल्या बालकांचा बळी गेला होता, या बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रूपयेप्रमाणे ५० लाख रूपयांचे धनादेश चोपडा यावल मतदारसंघाचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले . यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहात सेवा हक्क दिना निमित्त आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .  या तालुकास्तरिय आढावा बैठकीस यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार , यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ .मंजुश्री गायकवाड ( बोरसे ),पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी विश्र्वनाथ धनके,यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जहॉंगीर तडवी यांच्यासह वनविभागाच्या पश्चीम क्षेत्राचे वनपाल विपुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मनवेल तालुका यावल येथे दिनांक ६ मार्च रोजी बिबट्याच्या हल्ल्यात केशव बारेला या ७ वर्षीय बालकाला आपला जिव गमवावे लागले होते तर डांभुर्णी तालुका यावल या गाव शिवारात दिनांक १५ एप्रील रोजी मेढपालन करणाऱ्या ठेलारी कुटुंबातील रत्नाबाई या २ वर्षीय लहान चिमकुलीचा बिबट्याने बळी घेतला होता,दरम्यान या मरण पावलेल्या दोघा बालकांच्या कुटुंबास शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत तात्काळ मिळावी याकरीता चोपडा यावल मतदारसंघाचे आमदार प्रा . चंद्रकांत सोनवणे यांनी सातत्याने शासन दरबारी सर्वतोपरीने प्रयत्न करीत त्यांना आर्थिक मदत मिळून दिली .

No comments

श्री प्रसाद फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहि...

फैजपूरच्या प्रांत कार्यालयाच्या मागील बाजूच्या आवारात कुजलेल...

रावेर पंचायत समितीचे नुतन गटविकास अधिकारींनी तातडीने मागविला...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णा कृती पुतळा समितीच्या व...

विरावली गावात कृषिकन्यानं कडून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आ...

राग - द्वेष - मोह- माया हेच मानवाचे खरे शत्रू... - भिक्खु ...

जनसुरक्षा अधिनियम मागे घेण्यात यावे.. लातुरातील विधिज्ञाचे ...

वृक्षारोपण चळवळीस पालिकेचे नेहमी सहकार्य - मुख्याधिकारी मच्छ...

आयएएस अधिकारी डॉ. प्रवीण पुरी यांची संभाजी पुरीगोसावी यांनी ...

शिक्षकांचे संसद दर्शन.. लोकशाहीचा थेट अनुभव..खासदार नीलेश लं...