भालोद येथे आज मरी मातेचा यात्रा उत्सव १२ वर्षीय भगत रणवीर कोळी ओठणार बारागाड्या भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
भालोद येथे आज मरी मातेचा यात्रा उत्सव
१२ वर्षीय भगत रणवीर कोळी ओठणार बारागाड्या
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भालोद ता यावल : शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या येथील आठवडे बाजारातील श्री मरी माता यात्रा अक्षय तृतीये दिवशी तर श्री खंडेराव महाराज यात्रा दि १ मे गुरुवार रोजी आहे .
गेल्या शेकडो वर्षापासून यात्रा उत्सव असतो सुरुवातीपासूनच कोळी घराण्यांकडे बारा गाड्या ओढण्याची परंपरा असून यात्रेचे विशेष म्हणजे बारा गाड्या आहे परिसरातील व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर बारा गाड्या बघण्यासाठी येत असतात श्री मरीमाता येथे भगत रणवीर राजू कोळी हा ११ वर्षी मुलगा हे बारा गाड्या ओढणार आहे . भगत यांच्यासोबत पंढरी भागवत कोळी, शंकर भोई, चेतन कोळी, प्रवीण कोळी, सोनू कोळी, बबलू कोळी, तुषार वसंत कोळी, भागवत कोळी वायरमन, सरपंच प्रदीप श्रीराम कोळी, सामाजिक कार्यकर्ते जितू कोळी ,सुनील मधुकर कोळी, राजू सुधाकर कोळी, तुषार वसंत कोळी, निलेश पंढरी कोळी, दिनेश वसंत कोळी, पितांबर कुंभार, एकनाथ कुंभार बारा गाड्या बांधणारे पिंटू दिनकर चौधरी, ललित प्रभाकर चोपडे, भरत यशवंत चौधरी, मिलिंद लक्ष्मण झांबरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात
No comments