जि.प. मुख्याधिकार्यांनी नागरिकांना भेटण्याची वेळ व दिवस वाढवून देण्याची श्री.सानप यांची मागणी भुसावळ प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवा...
जि.प. मुख्याधिकार्यांनी नागरिकांना भेटण्याची वेळ व दिवस वाढवून देण्याची श्री.सानप यांची मागणी
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
- येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जळगाव जिल्हा परिषद मुख्याधिकारी मिनल करणवाल यांची भेट घेवून त्यांना जिल्ह्याभरातून येणार्या नागरिकांना भेटीसाठी केवळ सोमवार व शुक्रवार असे दोन दिवस ठरवून दिलेले आहे. मात्र या वेळेत येणार्या सर्व नागरिकांना आपले काम पूर्ण करता येत नाही अथवा भेटही होत नाही. याबाबत आठवड्याचे दिवस वाढवून देण्यात यावे अशी विनंती श्री.सानप यांनी केली आहे.
श्री. सानप यांनी दिलेल्या विनंती अर्जात म्हटले आहे की, आपण जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी आठवड्याचे प्रत्येक सोमवार व शुक्रवार असे दोन दिवस सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंतचा वेळ ठरवून दिलेली आहे. तथापी आपल्या भेटीसाठी नागरिक मोठ्या संख्येने व आशेने त्यांचे काम घेवून येतात. मात्र बर्याच नागरिक ते दूरच्या ठिकाणावरून आलेल्या असता त्यांना रिकाम्या हाती परत जावे लागते. याकरिता आपण भेटीसाठी फक्त सोमवार व शुक्रवार ऐवजी आपण ज्या ज्या वेळेस कार्यालयात असाल त्यावेळी नागरिकांना भेटीसाठी वेळ देण्यात यावा, अशी विनंती केली असून याबाबत आपण जी कारवाई कराल अथवा निर्णय घ्याल त्यांची एक प्रत माहितीस्तव सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांना देण्यात यावी, अशी विनंती वजा मागणी श्री.सानप यांनी केली आहे.

No comments