चोपड़ा ग्रामीण पोलिस स्टेशनची धड़क कारवाई पाच काडसुतासह दोन पिस्टल जप्त चोपड़ा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपड़ा ग्रामीण पोलिस स...
चोपड़ा ग्रामीण पोलिस स्टेशनची धड़क कारवाई पाच काडसुतासह दोन पिस्टल जप्त
चोपड़ा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपड़ा ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत लासुर ते हातेड रस्त्यावरून ज्यूपिटर स्कुटीने MH.18 BV.8905 मोटरसायकलने जात असताना चोपड़ा ग्रामीण पोलिस स्टेशन च्या पोलिसांनी गुप्त माहिती वरुन सापळा त्यांना हटकले असता त्यांच्या जवळ दि.13/04/2025 रोजी रात्री 2.45 वा.चे सुमारास लासुर कडुन हातेड रोड कडे येत असलेले आरोपी नामे 1) राकेश सुरेश पिंगळे वय 32 वर्ष धंदा मजुरी रा.स्टेशन रोड मागे,मिल परीसर,प्लाट नं.35,राम मंदीर जवळ, धुळे ता.जि.धुळे 2) अजयसिंग सक्कुसिंग वरकडे वय.25 वर्ष धंदा. मजुरी रा.ह.मु.दहिवद फाटा, शिरपुर ता.शिरपुर जि.धुळे मुळगाव. गौरीया ता. कुंडम जि. जबलपुर (म.प्र) यांनी बेकायदेशीररीत्या विनापरवाना दोन गावठी कट्टे (पिस्टल), 05 जिवंत काडतुस, Vivo कंपनीचा V40e मोबाईल त्यात jio कंपनीचे सीम तसेच 200/- रु. रोख रक्कम स्वतःचे कब्जात बाळगताना एकुण 1,33,200/- रु.कि.चा माल मिळुन आला म्हणुन त्यांचे विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम गुन्हा नोंद करण्यात आला. 3/25, प्रमाणे कायदेशीर फिर्याद असुन सदर गुन्ह्याचा तपास चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन चे पो.निरी कावेरी कमलाकर हे स्वता करीत आहेत.

No comments