adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भिक्षुकांचा उपचारादरम्यान मृत्यू नव्हे तर हि हत्या खासदार निलेश लंके यांचा आरोप

  भिक्षुकांचा उपचारादरम्यान मृत्यू नव्हे तर हि हत्या खासदार निलेश लंके यांचा आरोप  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्य...

 भिक्षुकांचा उपचारादरम्यान मृत्यू नव्हे तर हि हत्या खासदार निलेश लंके यांचा आरोप 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.८):-शिर्डी येथे भिक्षा मागून जगणाऱ्या ४९ भिक्षुकांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना विसापूर कारागृहात पाठवले त्यातील १० भिक्षुकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते.त्यातील २ दिवसात ४ भिक्षुकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.हा मृत्यू नसून हत्या आहे असा आरोप खासदार निलेश लंकेनी केला.खासदार लंकेंनी उपचार घेत असलेल्या भिक्षुकांची जिल्हा रुग्णालयात भेट घेत त्यांची तब्बेतीची विचारपूस केली,त्याच बरोबर प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्न उपस्थित केले,या १० भिक्षुकांपैकी ३ जण रुग्णालयातून पळून गेले,या वेळी पोलीस आणि रुग्णालय प्रशासन काय करत होते,१० भिक्षुकांना रुग्णालयात आणल गेल त्यांना कारागृहात डांबून ठेवण्यात आले होते का ? असा प्रश्न देखील उपस्थित केला,तसेच मयत झालेल्या भिक्षुकांची इन कॅमेरा संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पोस्टमार्टम करून चौकशी करावी अशी मागणी या वेळी केली.नाव न घेता माजी खासदार सुजय विखेंवर निशाणा 

खासदार लंके म्हणाले एका युवा नेत्याच्या मागणीमुळे कधी नव्हे ती भिक्षुकांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले,ही प्रशासनाची चूक आहे. याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल यावेळी खासदार लंकेंनी उपस्थित केला.

No comments