adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

1 कोटी 97 लाख 50 हजारांची रोकड घेऊन जात असलेली कार पकडली पोलिसांनी पकडली

 1 कोटी 97 लाख 50 हजारांची रोकड घेऊन जात असलेली कार पकडली पोलिसांनी पकडली  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर :23/5/...

 1 कोटी 97 लाख 50 हजारांची रोकड घेऊन जात असलेली कार पकडली पोलिसांनी पकडली 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर :23/5/25- मलकापुर-बुलढाणा रोडवरील बोदवड नाका येथे पोलिसांनी एका सिल्वर रंगाच्या ईरटीगा कारमधून 1 कोटी 97 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. ही कार छत्रपती संभाजीनगर येथील दोन इसम घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ सापळा रचून ही कार अडवली मलकापूर शहर पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली गाडीची तपासणी केली असता,


सीटखाली लपवलेली मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली आहे. विचारणा केली असता संबंधित इसम रकमेबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कारसह दोघा व्यक्तींना मलकापूर शहर पोलीस स्टेशनला  आणण्यात आले. तहसीलदार राहुल तायडे, महसूल अधिकारी व बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हिडीओ शूटिंगसह रोख रकमेची मोजणी करण्यात आली.

संपूर्ण रक्कम तात्काळ जप्त करून आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून रक्कम जिल्हा कोषागारात जमा केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.

No comments