adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल वनविभागाच्या सतर्कतेने सातपुडा वनक्षेत्रात परप्रांतीयांचा शिकारी करण्याचा प्रयत्न फसला शिकारी झाले पसार

  यावल वनविभागाच्या सतर्कतेने सातपुडा वनक्षेत्रात परप्रांतीयांचा शिकारी करण्याचा प्रयत्न फसला शिकारी झाले पसार  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी ...

 यावल वनविभागाच्या सतर्कतेने सातपुडा वनक्षेत्रात परप्रांतीयांचा शिकारी करण्याचा प्रयत्न फसला शिकारी झाले पसार


 भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  मिळालेल्या गुप्त बातमी वरून यावल वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वन विभागात रेंज पथक वैजापूर सह वैजापूर वन क्षेत्रातील परिमंडळ वैजापूर मधील कक्ष क्रमांक२२६ २२५ ,२२३ व २३२ या भागात गस्त करीत असतांना,कक्ष क्रमांक २३२ मधील जंगल भागात गावठी बंदुकीने फायर झाल्याचा आवाज आला वन विभागा च्या पथकाने आपल्या सहकर्मचाऱ्यांसह आवाजाच्या दिशेने गेलो असता काही अज्ञात इसम यांच्याकडे गावठी बंदुके दिसून आले तरी अज्ञात इसम यांचा पाठलाग केला असता पथकाची चाहूल लागताच इसम यांनी त्यांचें कडील कक्ष क्रमांक२३२ या भागात लपवलेले मोटर सायकल ०२ सोडून जंगल भागात दऱ्या खोऱ्यांचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले तरी अज्ञात इसम हे राखीव वनात परप्रांतीयांकडून अपप्रवेश करून शिकारीच्या उद्देशाने आलेले असुन जंगल भागात पथका सह फिरून पहिले असता कोणत्याही प्रकारे वन्यजीव हानी झालेली नाही तरी ०२  मोटार सायकल ह्या जप्त करून शासकीय वाहनाने चोपडा शासकीय आगारात जमा केल्यात सदरचा गुन्हा हा भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ ( १) (ड), (आय), महाराष्ट्र वन नियमावली ९ ,वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९व५२ चा भंग झाला असून त्याबाबत म.वनपाल वैजापूर यांनी प्रथम गुन्हा नंबर डबल्यु२ / २२ / ५ / २०२५ जारी केला आहे, सदरच्या कार्यवाहीत संपुर्ण रात्र गुन्हा थांबवण्यासाठी व आरोपीं चा पाठलाग करण्यासाठीं,आय एस तडवी वनपाल वैजापूर,संदीप भोई, चूनिलाल कोळी बाजीराव बारेला,भारसिंग बारेला, संदीप ठाकरे, निखिल माळी, हर्षल पावरा, गणेश बारेला, विजय शिरसाठ यांनी सहभाग नोंदवला.

 सदरची ही कार्यवाही ही नीनु सोमराज वनसंरक्षक धुळे प्रादेशिक, जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग प्रादेशिक जळगांव, प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक चोपडा, समाधान पाटील, सहाय्यक वन संरक्षक यावल व विकेश ठाकरे सर वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर यांच्या मार्गदर्शनाने झाली.

तरी वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर यांचे कडून जनतेस आव्हान करण्यात येते की आपल्या वनक्षेत्रास लागून कोणत्याही प्रकारे वन वनवा,अवैध वृक्षतोड,अवैध लाकुड वाहतूक, अतिक्रमण,अवैध शिकार व वन्यजीव तस्करी अश्या प्रकारचा गुन्हा निदर्शनास आल्यास महाराष्ट्र वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक१९२६  वर संपर्क करावा.

No comments