स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई 33 अवैध धंदयावर गुन्हे दाखल जिल्ह्यातून अवैधधंदे आता हद्दपार सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:-हेमकांत ग...
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई 33 अवैध धंदयावर गुन्हे दाखल जिल्ह्यातून अवैधधंदे आता हद्दपार
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि१४):-अहिल्यानगर, जामखेड,बेलवंडी,लोणी व संगमनेर येथील अवैध धंदयावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एकूण 33 गुन्हयांत 5 लाख 94,060/-रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार दि.12 मे 2025 रोजीतोफखाना,एमआयडीसी, जामखेड,बेलवंडी,लोणी व संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन,छापे टाकुन अवैध दारू,जुगार व अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यांविरूध्द कारवाई केली.पथकाने केलेल्या कारवाईमध्ये अवैध व्यावसायिकांविरूध्द एकुण 33 गुन्हे दाखल करून त्यामध्ये 5 लाख 94,060/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर,श्री.प्रशांत खैर अपर पोलीस अधीक्षक यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संदीप पवार,गणेश धोत्रे,अतुल लोटके, मयूर गायकवाड,आकाश काळे, शाहीद शेख,पंकज व्यवहारे, प्रमोद जाधव,अमृत आढाव, महादेव भांड,विश्वास बेरड, बिरप्पा करमल,बाळासाहेब नागरगोजे,भगवान थोरात, रोहित मिसाळ,ज्योती शिंदे, उमाकांत गावडे,हृदय घोडके, गणेश भिंगारदे,रविंद्र घुंगासे, जालींदर माने,रोहित येमुल, गणेश लोंढे,सोमनाथ झांबरे, रणजीत जाधव,रमीजराजा आत्तार,विशाल तनुपरे यांनी केली आहे.

No comments