डांभुर्णी येथे सप्तश्रृंगी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा. द्वीप प्रजलित करताना माजी आमदार रमेश दादा चौधरी विद्यमान आमदार अमोल द...
डांभुर्णी येथे सप्तश्रृंगी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा. 
द्वीप प्रजलित करताना माजी आमदार रमेश दादा चौधरी विद्यमान आमदार अमोल दादा जावळे शरद दादा महाजन व इतर मान्यवर आहे
भरत कोळी यावल ता.प्रतिनीधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
डांभुर्णी येथील सप्तश्रृंगी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित डांभुर्णी या संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला सप्तश्रृंगी पतसंस्थेची स्थापना दि. १० /५ / २००० साली पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सोनू गोमा भंगाळे यांनी गावातील ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने या पतसंस्थेची उभारणी केली सुरुवातीला विविध कार्यकारी सह. सोसायटीच्या छोट्याशा खोलीत संस्था सुरू करण्यात आली त्यानंतर दिवसेंदिवस संस्थेचे कामकाज उत्कृष्टपणे होत जात कालांतराने संस्थेने स्वतःची जागा घेऊन इमारतीचे बांधकाम केले आज रोजी पतसंस्था स्वतःच्या जागेवर कार्य करीत आहे संस्थेचे स्वतःचे गोडाऊन व दुकाने असून संस्थेने सभासदांकरिता व परिसरातील जनतेकरीता स्वर्गरथ शवपेटी पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहे संस्थेच्या या यशस्वी वाटचालीत सभासद ठेवीदार यांनी ठेवलेला विश्वास व कर्जदार सभासद यांनी वेळोवेळी कर्जाचा भरणा करून संस्थेचा व्यवसाय वाढविण्यास केलेली मदत ही मोलाचे ठरले व आजही सर्वांचा विश्वास पतसंस्थेवर कायम आहे.
पतसंस्थेने आयोजित केलेल्या या रौप्य महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.रमेश विठ्ठल चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून रावेर विधानसभा मतदारसंघाचे आ.अमोल हरिभाऊ जावळे शरद महाजन,नरेन्द्र नारखेडे माजी जि.प.सदस्य आर.जी . पाटील डॅा.दिवाकर खंडू चौधरी विद्यालयाचे चेअरमन डॉ.विवेक दिवाकर चौधरी यावल प.स.च्या माजी सभापती पल्लवीताई पुरुजीत चौधरी,चंद्रकांत चौधरी नारायण दादा चौधरी भंगाळे गोल्ड चे संचालक भागवत भंगाळे प्रगतशील शेतकरी सुरेश जीवराम चौधरी भिकारी सोमा सोनवणे माजी महापौर ललित भाऊ कोल्हे सिंधुताई कोल्हे लेखापरीक्षक पी.बी.विसपुते माजी नगर अध्यक्ष सुनील भाऊ खडके डॉ.केतकी पाटील उज्जैन सिंग राजपूत सरपंच कल्पनाताई कोळी उप सरपंच पुरुजीत गणेश चौधरी इ.सह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना व संस्थेच्या मयत सभासद यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तदनंतर दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.पी.लढे सर व कश्मीरा भंगाळे यांनी प्रास्ताविक रविंद्र निळेसर यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र सोनु भंगाळे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक संजय नारखेडे व गणेश साळुंके यांनी परिश्रम घेतले
No comments