चिनावल ग्रामपंचायत सदस्य नजीर शेख यांचे उपोषण मुबारक तडवी रावेर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथील ग्रामपंचायतींचे सत्ताध-ारी गटाचे प्रभ...
चिनावल ग्रामपंचायत सदस्य नजीर शेख यांचे उपोषण
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
येथील ग्रामपंचायतींचे सत्ताध-ारी गटाचे प्रभाग क्रमांक चार चे सदस्य शेख नजीर शेख बशीर यांनी चिनावल ग्रामपंचायत कार्यालयासमोर विकास कामे होत नसल्याने सुमारे ५ तास उपोषण केले. शेख नजीर यांच्या प्रभाग क्रमांक चार तसेच गावातील इतर प्रभागांमध्ये मी व सदस्य वारंवार मागणी करून ही आवश्यक विकास कामे साफसफाई तसेच माझी वसुंधरा मधून नियोजित कामे होत नसल्याने तसेच ग्रामस्थांना आश्वासित केलेले घरपोच सुविधा देण्यास ग्रामपंचायत टाळाटाळ करीत तसेच लोकन्युक्त सरपंच हे गावात उपस्थित रहाणे गरजेचे आहे सरपंच हे गावात वास्तव्सास नसल्याने आम नागरिकांना बरेच कामा साठी त्रास सहन करावा लागत आहे तरी सरपंच यांनी रोज ग्राम पंचायत कार्यालयास हजर राहण्या साठी पण उपोष्ण करण्यात आला असल्याने हे उपोषण अवलंबल्याचे शेख नजीर यांनी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच वृत्तपत्र प्रतिनिधींनी शी बोल-ताना शेख नजीर यांनी या उपोषणाची माहिती दिली. हे उपोषण त्यांनी दुपारपर्यंत करत ग्रामपंचायत प्रशासनाने ८ दिवसाच्या आत मागण्या पूर्ण करण्याच्या बोलीवर स्थगित केले. जर मांगण्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा उपोषण केले जाईल असा इशाराही दिला आहे.

No comments