यावल वन विभागात बुद्ध पौर्णिमेनिमित्त निसर्ग अनुभव कार्यक्रम 39 मचानां द्वारे होणार प्राणी गणना बिडगाव प्रतिनिधी :- खलील आर तडवी (संपादक ...
यावल वन विभागात बुद्ध पौर्णिमेनिमित्त निसर्ग अनुभव कार्यक्रम 39 मचानां द्वारे होणार प्राणी गणना
बिडगाव प्रतिनिधी :- खलील आर तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल वन विभागाच्या वतीने सोमवारी बुद्ध पौर्णिमेनिमित्त निसर्ग अनुभव उपक्रमात प्राणी गणना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख व सहाय्यक वनसंरक्षक चोपडा प्रथमेश हडपे यांच्या संकल्पनेतून यावल वन विभागातील चोपडा ते रावेर वन क्षेत्रातील जंगल भागात एकूण 39 मचानांची उभारणी करण्यात आली आहे प्रत्येक मचांणवर एकावेळी 3ते 4 व्यक्ती बसू शकतात यामध्ये चोपडा वन क्षेत्रात 3 वैजापूर 7 अडावद वन क्षेत्रात 5 देवझीरी 5 यावल पूर्व 6 यावल पश्चिम 5 तर रावेर वन क्षेत्रात 8 मचानांचा समावेश आहे प्राणी गणना ही कॅमेरा द्वारे केली जाणार असून प्रत्यक्ष निरीक्षण तसेच प्रेमी वन्यजीव अभ्यासक यावल वन विभागातील नैसर्गिक पानवट्यांची स्वच्छता दुरुस्ती पाण्याची व्यवस्था आणि मचान उभारणी कामे अंतिम टप्प्यात आहेत या कार्यक्रमाचे नियोजन माननीय वनसंरक्षक धुळे वनवृत्त निनू उपसरक्षक जमीर शेख सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश हडपे आणि सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे यावल वनविभागातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी. वनपाल वनरक्षक व वनमजूर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत बुद्ध पौर्णिमेनिमित्त विशेषतःबिबट. अस्वल, सायर, तडस चौ शिंगा, नीलगाय, रानडुक्कर,सांबर,हरीण ,असे थरारक वातावरण विविध पक्षांचे वन्यजीवांचे दर्शन रात्रीच्या वेळेस निरीक्षण करता येणार आहे

No comments