माजी आमदार कैलास पाटील मा.आ. दिलीप सोनवणे राष्ट्रवादीत आल्याने सत्कार. तालुक्यात आनंदाचे वातावरण. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गाय...
माजी आमदार कैलास पाटील मा.आ. दिलीप सोनवणे राष्ट्रवादीत आल्याने सत्कार.
तालुक्यात आनंदाचे वातावरण.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:--सद्ध्या जळगाव जिल्हयातील 2माजी मंत्री व तीन माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केल्याने अजितदादा गटात आनंदाचे वातावरण असून चोपडा तालुक्यात ही माजी आमदार कैलास बापू पाटील व माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
ना.अजितदादा पवार यांचे नेतृत्व हे सर्व महाराष्ट्राला मान्य असून त्यांची कामाची पद्धत ही सडेतोड असून काम करणारे नेतृत्व सर्वांनी स्वीकारले आहे.ना अजितदादा व माझे समंध अतिशय जिव्हाळ्याचे आहेत.मी आमदार असतांना मला दादांनी खूप मदत केली निधीची कमी नाही पडू दिली.दादांकडे महाराष्ट्र चालविण्याचे व्हिजन असून स्पष्टवक्तेपणा हा स्वभाव सर्वाना आवडतो.यापुढे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी मी सदैव काम करेल असे सत्काराला उत्तर देतांना कैलास पाटील म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम हल्ल्यात निष्पाप बळी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष (विजय) बाळासाहेब पाटील व शहर अध्यक्ष गिरीश देशमुख यांनी सत्कार समारंभ आयोजीत केला होता.त्यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हाध्यक्ष अमृतराज सचदेव, चोपडा कसबेचे चेअरमन प्रवीणभाई गुजराथी,जिल्हाउपाध्यक्ष परेश देशमुख कृषिभूषण हिरालाल पाटील,माजी झेड पी सदस्य सुनील पाटील,यांची उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्षप्रवेश केलेले जेष्ठ नेते तुकाराम पाटील,नौमान काजी यांचा ही सत्कार करण्यात आला.माजी आमदार दिलीपराव सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण पाटील,तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी रमाकांत बोरसे,रामचंद्र भादले,सुनील पाटील (सभापती)निलेश पाटील, महिला पदाधिकारी स्वाती बडगुजर,सविता पाटील,माया महाजन,यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष मिलिंद देवराम सोनवणे यांनी केले.

No comments