अकोला ACB पथकाची मलकापुरात कारवाई; सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन माळी 14 हजारांची लाच घेताना अटकेत अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमक...
अकोला ACB पथकाची मलकापुरात कारवाई; सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन माळी 14 हजारांची लाच घेताना अटकेत
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर :- 23/5/25 रेती वाहतुकीचा व्यवसाय चालू राहू देण्यासाठी १४ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन देवचंद माळी यांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. तक्रारदार हे रेती वाहतुकीचा व्यवसाय करत असून आरोपी पोलीस उपनिरीक्षकाने एप्रिल आणि मे महिन्यांसाठी प्रत्येकी ८ हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत थेट अॅन्टी करप्शन ब्युरो, अकोला येथे तक्रार दाखल केली. १३ मे रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपीने तडजोडीअंती १४ हजारांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर २३ मे रोजी शिवनेरी ढाबा, मुदडा पेट्रोलपंपाजवळ सापळा रचून आरोपी गजानन माळी याने तक्रारदाराकडून १४ हजार रुपये घेतल्याचे पंचासमक्ष सिद्ध झाले. त्यानंतर त्याला लाच रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात सापळा अधिकारी मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. अॅन्टी करप्शन ब्युरोने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास तात्काळ विभागाच्या 0724-2415370 या क्रमांकावर किंवा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा.

No comments