adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिक्षक निवृत्ती इंगळे "राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित"

  शिक्षक निवृत्ती इंगळे "राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित"    अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड)    म...

 शिक्षक निवृत्ती इंगळे "राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित"  



 अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

   मोताळा:- श्री अनंतराव सराफ विद्यालय,शेलापुर बुद्रुक तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा येथील सहायक शिक्षक निवृत्ती गोंडूजी इंगळे यांना नुकताच कोल्हापूर येथील सायबर कॉलेज हॉलमध्ये "राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान 2025" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सविस्तर असे की दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील उपक्रमशील, गुणवंत शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षक पॅनल अर्थात एम एस पी द्वारे आदर्श शिक्षक सेवा पुरस्काराने सन्मानित केले जाते.ह्यावर्षी कोल्हापूर येथील सायबर  कॉलेज  हॉल मध्ये सर्व पुरस्कारार्थींना मानाचा फेटा बांधून ढोलताश्याच्या गजरात पुष्पवृष्टी करत मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर कुंदन जमदाडे प्रस्तुत"वाह क्या बात है" हिंदी मराठी गाण्यांचा लाईव्ह आर्केस्ट्रा सादर करण्यात आला.


भोजनानंतर् महाराष्ट्र राज्य शिक्षक पॅनलचे अध्यक्ष माननीय श्री दीपक जी चामे,प्रमुख अतिथी सिने अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर,प्रसिद्ध कवी रोहितजी शिंगे,राज्य समन्वयक पंकज पालीवाल,बुलढाणा जिल्हा समन्वयक माननीय भास्कर डोसेे ,खंडेराव सर आदी मान्यवारांच्या उपस्थितीत पुरस्कारार्थी निवृत्ती इंगळे यांना त्यांच्या कुटुंबियां समवेत  शाल श्रीफळ बुके,सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र देऊन  गौरविण्यात आले.शिक्षक निवृत्ती इंगळे यांची शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी म्हणजे विद्यार्थी केंद्रित अनेक उपक्रम,विविध स्पर्धांचे आयोजन,चित्रकला परीक्षांचे मोफत वर्ग,अनेक प्रशिक्षणात मध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून  कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ,संगीत अशा विविध कला गुणांनी संपन्न असल्या मुळे त्यांची निवड करण्यात आली .यापूर्वीही त्यांना "कलाश्री पुरस्कार", "उपक्रमशील शिक्षक" म्हणून राज्यस्तरावर गौरविण्यात आलेले आहे.त्यांची"माय इझी इंग्लिश बुक ", "इनोव्हेटिव्ह टाइम्स "अशी पुस्तके  प्रकाशित झालेली आहेत.हॉरीझन या        नियत कालिकामध्ये त्यांनी संपूर्ण चित्रांकन चित्रांकन केलेले. आहे. ते विद्यार्थ्यांकडून इंग्रजीचे विविध उपक्रम,खोखो,चित्रकला परीक्षा,सहली काढणे, सांस्कृतिक कार्यक्रम,विविध स्पर्धा परीक्षा, गीत मंच असे अनेक शालोपयोगी विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवित असतात.अश्या कालागुण संपन्न, विद्यार्थिप्रिय शिक्षकाचा सन्मान ही अभिमानाची बाब असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मा.पराग दादा सराफ,मा.श्रीपाद दादा सराफ,आत्मारामभाऊ सावळे ,पांडुरंगजी भोपळे, मुख्याध्यापक डी.पी.सपकाळे ,पर्यवेक्षक संजय सावळे सर्व शिक्षक बंधु भगिनी शिक्षकेत्तर कर्मचारी परिसरातील पालक वर्ग यांनी सांगितले.

No comments