देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त...! मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांच्या मर्जीतला अधिकारी म्हणून ओळख.! संभाजी पुरीगोसावी ( मुंबई ) प्...
देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त...! मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांच्या मर्जीतला अधिकारी म्हणून ओळख.!
संभाजी पुरीगोसावी ( मुंबई ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे, 35 वर्ष उल्लेखनीय सेवा बजविणारे विवेक फणसळकर आज मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झाले, त्यानंतर विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे मुंबईत पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे, भारती हे मूळचे बिहारमधील दरभंगा येथील आहेत त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक केली आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदवी प्राप्त केली, त्यांनी मुंबईत डीसीपी झोन 9 आणि डीसीपी गुन्हे शाखा म्हणून काम पाहिले होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांच्या मर्जीतला अधिकारी म्हणून देवेन भारती यांना यांची चांगलेच ओळखले जाते,1994 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत, 2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मुंबईत प्रभावी पोलीस अधिकारी होते, तेव्हा ते सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) होते, त्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देवुन दहशतवाद विरोधी पथकांत नेमण्यात आले तसेच मुंबईतील 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या तपासकामी ते चांगलेच यशस्वी ठरले, महाविकास आघाडी सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची राज्य सुरक्षा महामंडळात अतिरिक्त महासंचालक म्हणून बदली करण्यात आली होती. पोलीस आयुक्त या पदावर जवळपास चार आयपीएस अधिकाऱ्यांनी चांगलीच फिल्डिंग लावली होती, मात्र अखेर देवेन भारती यांच्याकडे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार सोपविण्यात आला आहे
No comments