adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अट्रावल येथे शुक्रवार पासून शिवपुराण कथेचे आयोजन

  अट्रावल येथे शुक्रवार पासून शिवपुराण कथेचे आयोजन   भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल :- तालुक्यातील अट्रावल य...

 अट्रावल येथे शुक्रवार पासून शिवपुराण कथेचे आयोजन  


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल :- तालुक्यातील अट्रावल येथील महादेववाडी भागात महादेव मदिर जिर्णोद्धार निमीत्त महादेववाडी नगरात दिनांक २ पासून भव्य दिव्य शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री महादेव मंदिरातील या कथेची सांगता ८ मे ला होईल.महादेववाडी नगरातील श्री  महादेव मंदिरात २ मे पासून संगीतमय शिवपुराण कथा  सुरू होईल. दैनंदिन कार्यक्रमात रात्री ८ ते १०.३० या वेळेत  कथा वाचन केले जाणार आहे

. कथावाचक वृंदावन धाम येथील कृष्णकृपा प्रेम मूर्ती दिलीपजी महाराज रंवजेकर यांची उपस्थिती राहील.या कथेस गायणाचार्य प्रकाश चौधरी (चुंचाळेकर),गायक व बुलबुल वादक म्हणून मुकेश मेघे (सांगवी बुद्रुक), वेशभूषाकार आबा महाराज (नेर धुळे), तर तबल्यावर साथ राधेश्याम महाराज (लालमाती) हे देतील कथा श्रवणाचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहान आयोजकांनी  केले आहे

No comments