प्रा. भागवत पाटील यांना पीएच. डी. पदवी प्रदान जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ज. जि. म. वि. प्र. संस्थेचे नूतन मराठा महाविद्...
प्रा. भागवत पाटील यांना पीएच. डी. पदवी प्रदान
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ज. जि. म. वि. प्र. संस्थेचे नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव (रा. वरणगाव) येथील प्रा. भागवत छ. पाटील यांना इंग्रजी विषयात क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. 'द सिलेक्ट नॉव्हेल्स ऑफ अमिताव घोष: अ प्रॅगमॅटिक स्टडी' या विषयावर त्यांनी शोध प्रबंध सादर केला. क ब चौ उ म वि व्यवस्थापन परिषद सदस्य तथा मानवविद्या शाखा अधिष्ठाता प्रा. डॉ. जगदीश पाटील यांचे त्याना संशोधन कार्यात मार्गदर्शन लाभले. पीएच. डी. पदवी मिळाल्याबद्दल संस्थेचे मानद सचिव श्री निलेशभाऊ भोईटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख तसेच सहकारी प्राध्यापक आदींनी प्रा. डॉ. भागवत पाटील यांचे अभिनंदन केले.

No comments