adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

" कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांच्या खरीप पूर्व २०२५ हंगामपूर्व जिल्हास्तरीय कार्यशाळेत खते व कीटकनाशकांचा संतुलित वापर करून विषमुक्त अन्न निर्मिती करण्याचा निर्धार,विक्रेत्यांच्या संघटना ५०००बॅनर तयार करणार ..खूप खूप अभिनंदन...एस बी नाना पाटील.

" कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांच्या खरीप पूर्व २०२५ हंगामपूर्व जिल्हास्तरीय कार्यशाळेत खते व कीटकनाशकांचा संतुलित वापर करून विषम...

" कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांच्या खरीप पूर्व २०२५ हंगामपूर्व जिल्हास्तरीय कार्यशाळेत खते व कीटकनाशकांचा संतुलित वापर करून विषमुक्त अन्न निर्मिती करण्याचा निर्धार

विक्रेत्यांच्या संघटना ५०००बॅनर तयार करणार ..खूप खूप अभिनंदन...एस बी नाना पाटील.


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

६मे २०२५रोजी जळगाव जिल्ह्यातील कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांची कार्यशाळा मा.मंत्री संजयजी सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी आयुष प्रसादजी,विभागीय कृषी सहसंचालक काटकरजी,जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी जी,जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के जी,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास जी बोरसे,ज्येष्ठ शास्त्रज्ञ बी डी जडे जी,महाबीज चे संजय देवरे जी,विजय पवार जी संघटनेचे कैलास मालू जी,उपाध्यक्ष राजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  संपन्न झाली._ 

  यावेळी  वरील साऱ्या मान्यवरांनी रासायनिक खतांच्या व कीटकनाशक यांच्या अनावश्यक वापरा संबंधी चिंता व्यक्त केली. मी माझ्या मनोगतात जिल्ह्यातील लहान वयात कोणतेही व्यसन नसलेल्या आपल्या मुलांना होणारे डायबिटीस,कॅन्सर,किडनी सह ऑटो इम्युन ज्यात शरीरातील आपल्याच अँटिबॉडीस आपल्या पेशींसोबत लढत असलेल्या आजरा बाबत माहिती दिली. नुकत्याच झालेल्या काही गावातील शेकडोच्या संख्येने डायबेटिस असो की काही गावातील प्रचंड किडनी रुग्ण याला प्रमुख कारण अन्नधान्य/भाजीपाला मधील वाढलेले कीटकनाशकांचे प्रमाण असून जेथे जास्त भाजीपाला उत्पादन तेथे रुग्ण जास्त याचे कारण तेथे त्याच त्याच शेतात वारंवार कमी कालावधीचे भाजीपाला पिके घेतली जातात तेथे तणनाशकांचा देखील वर्षातून खूप वेळा वापर होतो व इतर कीटकनाशकांचा देखील.पर्यायाने जमिनीत काही साचून असलेले व परत टाकलेले याचा एकत्रित परिणाम होऊ शकतो म्हणून त्याचा अभ्यास होणे देखील गरजेचा आहे, हे सुचवले.

  मित्रांनो,🙏आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये( toxin ) बाहेर फेकण्याचे काम किडनी करते,त्यातून जे गेले नाही ते किडनी, यकृत (liver)असो की स्वादुपिंड(Pancreas) यात साचते व मग डायबेटिस,किडनी रोग,कॅन्सर हे होतात.

  पूर्वी आजोबा माझ्या नातवाला आंबे खायला मिळावे म्हणून झाड लावायचे पण आता किमान नातू निरोगी रहावा यासाठी विषमुक्त कसे देता येईल  यासाठी साऱ्यांनी एकत्रित काम करावे अशी विनंती केली. त्यासाठी प्रमुख कारण आहे की शेतकरी वर्गाला पिक निहाय खतांचे/फवारणी चे औषधांचे योग्य प्रमाण माहीत नसल्याने त्यांचा अतिरिक्त वापर वाढत आहे. त्यासाठी प्रमुख आठ दहा पिकांसाठी  खतांचा व कीटकनाशकांचा असे दोन चार्ट व एकात्मिक कीड नियंत्रणासाठी आंतरपीक व इतर माहितीचा एक असे एकूण तीन चार्ट प्रत्येक गावात लावल्यास व अधिकारी आणि कृषी केंद्र चालक यांनी ठरवले तर १०%खते/,कीटकनाशक यांचा वापर कमी होऊ शकतो अशी विनंती मी केली....मला सांगायला आनंद वाटतो की तडवी साहेब व म्हस्के साहेब यांनी चार्ट तयार करण्याची जबाबदारी घेतली तर कृषी केंद्र संचालकांच्या संघटनेच्या वतीने श्री विनोद तराळ जी यांच्या वतीने श्री कैलास मालू जी यांनी जाहीर केले की आम्ही जिल्ह्यात ५०००चार्ट तयार करून जनजागृती करू व कॅन्सर मुक्त जळगाव  करण्यासाठी बोगस बियाणे व बोगस खते/कीटकनाशक कंपनीना थारा देणार नाहीत.

ही बैठक फक्त एक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी नव्हती,याचा विशेष आनंद झाला,सारे मालक बंधू त्यात प्रदीप जी लोढा यांच्यासह असंख्य वयोवृद्ध संचालकांनी  बैठक झाल्यावर माझ्याशी व्यक्तिगत चर्चा केली, जळगाव जिल्ह्यातील मानवतावादी व्यक्ती अजून जिवंत असल्याचा प्रत्यय आला .... नक्कीच यश मिळेल.पुन्हा एकदा जिल्हाधिकारी महोदय,कृषी अधिकारी व कृषी केंद्र चालक,त्यांचे संघटना पदाधिकारी यांचे खूप खूप आभार.

No comments