adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्रीरामपूर शहरातील विस्थापित दुकानदारांचे २ जुन रोजी पालिकेसमोर जवाब दो आंदोलन

  श्रीरामपूर शहरातील विस्थापित दुकानदारांचे २ जुन रोजी पालिकेसमोर जवाब दो आंदोलन दुजाभाव करत गोर - गरीबांवर केलेल्या अन्यायाचा जबाब विचारणार...

 श्रीरामपूर शहरातील विस्थापित दुकानदारांचे २ जुन रोजी पालिकेसमोर जवाब दो आंदोलन

दुजाभाव करत गोर - गरीबांवर केलेल्या अन्यायाचा जबाब विचारणार - त्रिभूवन 

पुनर्वसन होत नाही तोपर्यंत विस्थापित दुकानदारांना आहे त्याच ठिकाणी व्यावसायासाठी ५ फुटाची जागा द्यावी; दुकानदार पुनर्वसन समिती ची मागणी


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शहरातील अतिक्रमणे काढताना नगर पालिका प्रशासनाकडून गोर - गरीबांवर मोठा अन्याय करण्यात आला, धनदांडग्यांची अतिक्रमणे आहे तशीच तर जेसीबी द्वारे गोर गरीबांची घरे आणी दुकाने भुईसपाट करण्यात आली हा दुजाभाव कशासाठी व कुणाच्या आशिर्वादाने करण्यात आला ?  याचा जबाब विचारण्यासाठी विस्थापित दुकानदारांचे सोमवार दि.२ जुन २०२५ रोजी श्रीरामपूर नगरपालिकेवर जवाब दो आंदोलन करण्यात येणार असल्याचे दुकानदार पुनर्वसन समिती चे अध्यक्ष सुभाष दादा त्रिभूवन यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने सोमवार दिनांक २ जुन २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता श्रीरामपूर नगरपालिकेवर अतिक्रमणात विस्थापित झालेल्या दुकानदारांना त्यांची दुकाने काढले त्या जागेवर पुनर्वसन होईपर्यंत व्यावसायासाठी पाच फुटाची जागा द्यावी या मागणीसाठी तसेच फक्त ठराविक दुकानदारांवर नगरपालिकेने अन्याय केला याचा जबाब विचारण्यासाठी मुख्याधिकारी जबाब दो आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष दादा त्रिभूवन व मर्चंट असोसिएशन चे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी दिले आहे. 

या निवेदनात असे म्हटले आहे की, गेल्या २९ फेब्रुवारी रोजी मा.उच्च न्यायालयाच्या व राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील अतिक्रमाणे काढण्यात आली आहे,त्यात सर्वात मोठी कारवाई फक्त श्रीरामपूर शहरांमध्ये काही ठराविक दुकानदारांवरच करण्यात आली आहे, श्रीरामपूर शहरांमध्ये अनेक धन दांडगे लोकांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत, त्या लोकांच्या अतिक्रमणाकडे जाणिवपूर्वक कानाडोळा करून श्रीरामपूर नगरपालिकेने गोर- गरिबांच्या घर,दुकानावर जेसीबी फिरवून त्यांच्या दुकानाची व घर संसाराची राख रांगोळी करून घोर अन्याय करत त्यांच्यावर

उपासमारीची वेळ आणली आहे. अतिक्रमणे काढत असताना श्रीरामपूर शहरामध्ये श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात दुजाभाव करत फक्त गोर- गरिबांचे बेलापूर रोड,संगमनेर रोड, गोंधवणी रोड, नेवासा रोड, तसेच शहर पोलीस स्टेशन समोर,भाजी मंडई समोर या ठिकाणचे अतिक्रमणे काढत त्या दुकानदारांवर श्रीरामपूर नगरपालिकेने अन्याय करून  श्रीरामपूर शहरातील उर्वरित अतिक्रमणांना अभय दिले आहे, याचा जाबाब विचारण्यासाठी व पुनर्वसन होईपर्यंत विस्थापित दुकानदारांना आहे त्याच ठिकाणी पुन्हा दुकाने चालू करण्यासाठी किमान ५ फुटाची जागा देत श्रीरामपूर नगरपालिकेने परवानगी द्यावी, अन्यथा अतिक्रमणधारक विस्थापितांना जो नियम लावला तो नियम श्रीरामपूर शहरातील सर्वच अतिक्रमणधारकांना लावण्यात यावा या मागणीसाठी सोमवार दिनांक २ जुन रोजी सकाळी ११:३० वाजता श्रीरामपूर नगर पालिकेसमोर श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनास विस्थापित दुकानदारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समिती चे अध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन व मर्चंट असोसिएशन चे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी केले आहे.

याप्रसंगी किशोर ओझा, फयाज पठाण, कैलास बाविस्कर, अविनाश सुपेकर, अझरुद्दीन अत्तार,अक्षय गवळी, रवी चव्हाण, राकेश थोरात, जुनेद मलिक, सुनील दंडवते, श्रीकृष्ण लावर, अशोक लोणकर, तरन्नुम शेख, अश्फाक अत्तार, अदनान मलिक,जावेद अख्तर, संदीप भावसार, ऋषिकेश कासलीवाल, अक्षय निकुंभ, प्रदीप निकुंभ, अरुण जयसिंग, जयसिंग देवकाते, मन्सूर बागवान, आतिश बाविस्कर, रमेश श्रीवास्तव, गणेश कुंवर, सतीश चव्हाण, गणेश पवार, विकी चव्हाण, रामू पवार, किशोर कंट्रोड, हरी क्षीरसागर,बिलाल अत्तार, असिफ मणियार, गणेश कुंवर,सरदार आत्तार, वसीम बागवान, सलीम बागवान, इम्रान बागवान, आसिफ बागवान, शाहिद बागवान आदी विस्थापित दुकानदार व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वृत्त विशेष सहयोग

पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मिडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 956117411

No comments