adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

किनगाव येथे पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी २२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  किनगाव येथे पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी २२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भरत क...

 किनगाव येथे पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी २२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : तालुक्यातील किनगाव या गावात मयुरी पेट्रोल पंपासमोरून सायकलव्दारे २२ वर्षीय तरुण हा आपल्या घरी जात होता. त्यास एका अज्ञात वाहनाने घडक दिली होती यात तो गंभीर जखमी झाला होता तेव्हा त्याला उपचारा करीता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सोमवारी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किनगाव या गावातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर - बऱ्हाणपूर राज्य मार्गावर मयुरी पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर गणेश भास्कर धनगर वय २२ हा तरुण सायकल घेऊन घरी जात होता. दरम्यान त्याला कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडके गणेश धनगर हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. तेव्हा याप्रकरणी सोमवारी यावल पोलीस ठाण्यात भास्कर तुळशीराम धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.

अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.या अपघाताची संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज हे यावल पोलिसांना देण्यात आली आहे त्यानुसार यावल पोलिसांनी पुढील तपासाची दिशा देखील ठरवल्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांनी सांगितले लवकरच सदर वाहन हे शोधून ताब्यात घेतले जाईल असे त्यांनी सांगितले आहे.

No comments