मोठा वाघोद्यात नागरिकांच्या जिवाशी खेळ?पावसाळापुर्व नालासफाईसाठी गोरगरीब रहीवासी रस्त्यावर कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करण्याची मागणी ...
मोठा वाघोद्यात नागरिकांच्या जिवाशी खेळ?पावसाळापुर्व नालासफाईसाठी गोरगरीब रहीवासी रस्त्यावर
कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करण्याची मागणी
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा बु येथील गावाच्या मध्यभागात असलेल्या लेंडीनाला निंभोरा रोडवरील नाल्याची पावसाळ्यापूर्वी सफाई न झाल्याने व नाल्यात साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी मोठमोठे गवत आणि गवतामुळे प्रचंड प्रमाणात वाढलेली डासांची उत्पत्ती आणि डासांच्या प्रादुर्भावाने गावात डेंग्यू मलेरिया सदृश आजारांचे बाधित रुग्ण वाढल्याने मोठा वाघोदा बु येथील निंभोरा रोडवरील रहिवाशांनी आज सकाळी ९ वा निंभोरा मोठा वाघोदा बु रस्त्यावरील नाल्याच्या पुलावरच ग्रामपंचायत सदस्यांसह वंचित चे पदाधिकारी तरुण महिला वर्ग यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले
सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी व संरपच अलकाबाई महाजन यांनी आंदोलन स्थळी उपस्थित होऊन दखल घेतली तातडीने जे. सी. बी. व ट्रॅक्टर द्वारे नाला सफाई ला सुरवात केली व आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.परंतु सपूर्ण नाल्याची पावसाळ्यापूर्वी नाल्याची सफाई न झाल्यास पूर येऊन गोरगरिबांच्या घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायत जातीने लक्ष देऊन पावसाळा पुर्वी नाला सफाई करुन डास निर्मुलनासाठी औषध मिश्रित धुर धुरळणी करण्याची मागणी यावेळी केली पावसाळ्याच्या दिवसात यापूर्वी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचून पूर सदृश परिस्थिती निर्माण होते गोरगरीब च्या घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरुन नुकसान झाले होते आणि आतापासूनच पाणी तुंबलेल्या अवस्थेत आहे जोरदार पाऊस पडल्यास पुरसदृश सारखी पुनरावृत्ती होऊ शकते तरी मोठा वाघोदा ग्रामपंचायत सह आरोग्य विभाग यांनी याकडे लक्ष द्यावे आणि संपूर्ण गावात पावसाळा पुर्वी नाला सफाई डास निर्मुलनासाठी औषध मिश्रित धुर धुरळणी फवारणी करावी अशी मागणी यावेळी केली. या ठिय्या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य सुपडू वाघ, करण तायडे, मलिक शाकिर, मलक अलिम, अमोल वाघ, सद्दाम खान, मलिक वसिम खान यासह रहिवासी महिला यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला होता
मोठा वाघोदा ग्रामपंचायत कार्यालयात प्रभारी ग्रामसेवक यांच्या कडे १८सदसीय ग्रामपंचायत चा प्रभारी पदभार असल्याने नागरी सेवा सुविधांचा अभाव असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे सोयीसुविधांचा अभावामुळे साथरोग फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही? तरी जिल्हा परिषद च्या कर्तव्यदक्ष मुख्यकार्यकारी अधिकारी संबंधितांनी तात्काळ मोठा वाघोदा ग्रामपंचायत कार्यालयात कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली


No comments