अंतुर्ली येथे श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अंतुर्ली ता.मु...
अंतुर्ली येथे श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली ता.मुक्ताईनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे राजेंद्र भाऊराव ठोंबरे व प्रथमेश विजय ठोंबरे आणि समस्त ठोंबरे परिवार यांनी स्वर्गीय भाऊराव नामदेव ठोंबरे व स्वर्गीय विजय भाऊराव ठोंबरे यांचे स्मृती प्रित्यर्थ श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन मिती वैशाख शुद्ध २ शुक्रवार दिनांक २ /५/ २५ पासून मिती वैशाख शुद्ध १२ शुक्रवार दिनांक ९/ ५/२५ रोजी सांगता आहे. दररोज सकाळी ५ ते ६ काकड आरती ,सकाळी९ ते १ भागवत, कथा संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० हरी कीर्तनाचा कार्यक्रम .दिनांक ९ /५ /२५ शुक्रवारी सकाळी ९ ते ११ ह.भ. प.मनोहर देव महाराज यांचे काल्याचे किर्तन दुपारी बार१२ते ३ महाप्रसाद व संध्याकाळी ४ ते ७ पर्यंत दिंडी सोहळा .
श्रीमद् भागवत कथा वाचक ह.भ.प.श्री दिलीप जी महाराज साठे बेलाड यांचे मधुर वाणीतून भावी भक्त लाभ घेत आहेत तरी सर्व भाविक भक्तांनी अंतुरली पंचक्रोशीतील महाप्रसादास उपस्थित राहावे अशी विनंती ठोंबरे परिवारातर्फे करण्यात आली आहे.

No comments