घोडगाव येथील उपसरपंच संतोष कोळी पाय उतार ? गलंगी ता. चोपडा मच्छिंद्र रायसिंग (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील उप...
घोडगाव येथील उपसरपंच संतोष कोळी पाय उतार ?
गलंगी ता. चोपडा मच्छिंद्र रायसिंग
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील उपसरपंचपदी असलेले संतोष उत्तम कोळी रा. घोडगाव यांची माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार पायउतार झाल्याची बातमी अनेर परिसरात वाऱ्यासारखी पसरतांना दिसत असुन जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज ग्रामपंचायत सदस्य सुनील रामकृष्ण कोळी व ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते किशोर दुसाने यांनी केलेला होता. त्या अनुषंगाने संतोष उत्तम कोळी उपसरपंच घोडगाव तालुका चोपडा यांचे जात वैधता प्रमाणपत्र साधर न केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959चे
कलम 10-1 अ नुसार ग्रामपंचायत घोडगाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील सदस्य व उपसरपंच असलेले संतोष कोळी यांना अपात्र ठरवण्याच्या आदेश पारित करण्यात आले आहे. सदर प्रत तहसीलदार चोपडा व गटविकास अधिकारी चोपडा यांच्या माहितीसाठी पाठवण्यात आले आहे. असे ग्रामपंचायत सदस्य सुनील कोळी व किशोर दुसाने यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले

No comments