यावलः चिखली येथे अवैध गोण खणीज वाहतूक करणारे डंपर (वाहन) जप्त – यावल तहसीलची संयुक्त कारवाई भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत...
यावलः चिखली येथे अवैध गोण खणीज वाहतूक करणारे डंपर (वाहन) जप्त – यावल तहसीलची संयुक्त कारवाई
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल तहसीलदार यावल यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली येथे अवैधरीत्या गौण खणीज वाहतूक करणाऱ्या डंपरवर संयुक्त पथकाने धाड टाकून कारवाई केली. सदर डंपर तहसील कार्यालय, यावल येथे जमा करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की भालोद मंडळ अधिकारी अनिल सुरवाडे हे शासकीय कामानिमित्त यावल तहसील येथे जात असताना त्यांना सांगवी येथील पेट्रोल पंपाजवळ अवैधरित्या वाहतूक करणारे डंपर आढळून आले चौकशी केली असता सदर डंपर चालकाजवळ गौण खनीज वाहतूक करण्याचा परवाना नसल्याने डंपर यावल तहसील कार्यालय येथे जमा करण्यास सांगितले परंतु डंपर चालकाने वेगाने डंपर पळून नेत भालोद. अट्रावल. चिखली. निमगाव. अशा मार्गाने डंपर पळविण्याचा प्रयत्न केला परंतु महसूल पथकाने डंपरचा पाठलाग करून तालुक्यातील चिखली या गावाजवळ सदर डंपर पकडण्यात आले.
ही संयुक्त कारवाई भालोद मंडळ अधिकारी अनिल सुरवाडे व सावखेडा मंडळ अधिकारी अतुल बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये ग्राम महसूल अधिकारी बोरखेडा खुर्द, शरीफ तडवी. ग्राम महसूल अधिकारी सांगवी बुद्रुक, राजु गोरटे .ग्राम महसूल अधिकारी सावखेडा सिम निशांत मोहोर तसेच भालोद मंडळातील सर्व ग्राम महसूल सेवक सागर तायडे. हरीष चौधरी. विजय आढाळे.अय्युब तडवी. सुमन आंबेकर सहभागी झाले होते.

No comments