फैजपूर शहरातील मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा; नागरिकांची मागणी काल्पनिक फाईल चित्र इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपू...
फैजपूर शहरातील मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा; नागरिकांची मागणी
काल्पनिक फाईल चित्र
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर शहरात बऱ्याच दिवसापासून मोकाट श्वानांचा (कुत्र्यांचा) सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे काही दिवसांपासून शहरातील गल्लीबोळात तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर श्वानांचे कळप मोठ्या संख्येने वावरताना दिसत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे काही दिवसांवर शाळा सुरू होत असून सकाळच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत मुख्य रस्त्यावर सकाळच्या सुमारास श्वानांचे कळप बसलेली असतात यामुळे पालक वर्ग नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे दिवसा तसेच रात्रीच्या वेळेस ही मोकाट श्वान वाहनधारकांवर तसेच पायी चालणाऱ्यांवर भुंकतात व मागे लागतात संबंधित विभागाने या फिरणाऱ्या कळपांच्या मोकाट श्वानांची तात्काळ दखल घेऊन या फिरणाऱ्या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीयांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे.
No comments