adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांवचा ९५.२३% निकाल, सोनाली महाजन प्रथम!

  महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांवचा ९५.२३% निकाल, सोनाली महाजन प्रथम!   किरण चव्हाण अमळनेर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अमळनेर :- मार्...

 महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांवचा ९५.२३% निकाल, सोनाली महाजन प्रथम!  


किरण चव्हाण अमळनेर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अमळनेर :- मार्च 2025 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगाव तालुका अमळनेरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 87 टक्के गुणांसह सोनाली पुरुषोत्तम महाजन या विद्यार्थिनीने वर्गात प्रथम क्रमांक प्राप्त केला. 

याशिवाय, दुसरी रागिनी पाटील (83.20%), तृतीय मयुरी महाजन,पवन पाटील (82.80%), 

चौथ्या क्रमांकावर हर्षल कमलेश पाटील (82.20%) आणि पाचव्या क्रमांकावर राज दिलीप जाधव (81.80%) यांनी उत्तम गुण मिळवून विद्यालयाचा गौरव वाढविला आहे.

शाळेचा एकूण निकाल 95.23% असून, हा निकाल विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि शिक्षकांच्या समर्पित मार्गदर्शनाचा परिणाम आहे. 

विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन महात्मा जोतीराव फुले हायस्कूलच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष विलासराव पाटील, सचिव आईसाहेब मंदाकिनी शांताराम पाटील आणि इतर संचालक मंडळाच्या सदस्यांनी केले. तसेच, मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय. आर. महाजन, एस. के. महाजन, एच. ओ. माळी आणि अरविंद सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्यासाठी मार्गदर्शन दिले. या यशस्वी निकालाने शाळेच्या नावाचा आणि विद्यार्थ्यांच्या श्रमाचा नवाच इतिहास रचला आहे. निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे एक ते तीन मध्ये मुलींनी बाजी मारली आहे.भविष्यातही अशाच प्रकारे शाळा आणि विद्यार्थी उज्ज्वल यशस्वी होवोत, अशी सर्वांची शुभेच्छा आहे.

No comments