जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय, अमळनेर चा इयत्ता दहावीचा ९८.५५% निकाल किरण चव्हाण अमळनेर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) अमळनेर :- मार्च २०२५ ...
जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय, अमळनेर चा इयत्ता दहावीचा ९८.५५% निकाल
किरण चव्हाण अमळनेर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अमळनेर :- मार्च २०२५ मध्ये झालेल्या दहावीच्या निकालात जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय, अमळनेरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. ८९.२०% गुणांसह युतिका गोरख ठाकरे व जयश्री अरविंद विरकर या विद्यार्थिनींने प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय क्रमांक लक्ष्य सुनिल लोहार (८७.६०%), तृतीय क्रमांक तन्वी राजेंद्र पवार (८७.२०%), चतुर्थ क्रमांक हर्षल नारायण पाटील व दुर्गेश जितेंद्र महाजन यांनी उत्तम गुण मिळवून विद्यालयाचा गौरव वाढविला आहे. व शाळेचा एकूण निकाल ९८.५५% असून हा निकाल विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि शिक्षकांच्या समर्पित मार्गदर्शनाचा परिणाम आहे.
विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी. डी. पाटील, उपाध्यक्ष तथा प्राचार्य रावसाहेब के.डी. पाटील, खजिनदार दादासाहेब शैलेंद्र पाटील, सचिव मामासाहेब राधेश्याम पाटील, सदस्य बापूसाहेब एन.डी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्यासाठी मार्गदर्शन दिले. या यशस्वी निकालाने शाळेच्या नावाचा आणि विद्यार्थ्यांच्या श्रमाचा नवा इतिहास रचला आहे.भविष्यातही

No comments