adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यवतमाळ जिल्हा हादरला, प्राध्यापिका पत्नीने शिक्षक पतीचा खून करून मृतदेह जंगलात जाळला, लोहारा पोलीस अन् स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी पत्नीच्या मुसक्या आवळल्या..!!

  यवतमाळ जिल्हा हादरला, प्राध्यापिका पत्नीने शिक्षक पतीचा खून करून मृतदेह जंगलात जाळला, लोहारा पोलीस अन् स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी पत्नीच्...

 यवतमाळ जिल्हा हादरला, प्राध्यापिका पत्नीने शिक्षक पतीचा खून करून मृतदेह जंगलात जाळला, लोहारा पोलीस अन् स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी पत्नीच्या मुसक्या आवळल्या..!!



 संभाजी पुरी गोसावी (यवतमाळ जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 दारू पिण्यासाठी पैसे मागत अन् नेहमीच त्रास देणाऱ्या शिक्षक पतीच्या त्रासाला कंटाळून विष पाजून पतीचा खून केला आणि शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची खळबळजनक कबुली पाच दिवसांपूर्वी चौसाळा परिसरांत आढळून आलेल्या अर्धवट जळलेल्या मूतदेहाच्या प्रकरणात प्राध्यापिका असलेल्या मारेकरी पत्नीनेच पोलिसांपुढे ही कुबली दिली आहे. काही वेळ पोलीसही चक्रावले शहरांतील चौसाळी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आलेल्या आणि पोलिसात खुनाच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. हा तपास आव्हानात्मक पोलिसांसमोर होता मात्र लोहारा पोलीस आणि स्थानिक शाखेच्या पथकांने अखेर हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. चौसाळा परिसरांत 15 मे. रोजी एक अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता या प्रकरणाचे गंभीरता लक्षात घेता आरोपींच्या विरोधात  खुनाचा गुन्हा दाखल करून लोहारा पोलिसासह एलसीबीच्या पथकांने तपासाला गती देत अखेर तो मृतदेह शंतून अरविंद देशमुख (वय 32) सयोगनगर यांचा असल्याचे निष्पन्न झाले, त्यावरून पोलिसांनी त्यांचे घर गाठून चौकशी केली मात्र पोलिसांना प्राध्यापिका पत्नी निधी शंतून देशमुख (वय 23 ) हिचा जास्त संशय बाळगला होता. अखेर त्यामध्ये निधी देशमुख यांनी खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्राध्यापिका असलेल्या आरोपी निधी देशमुख आणि त्याच शाळेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शंतून देशमुख या दोघांचाही प्रेमविवाह झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी प्राध्यापिका आरोपी निधी देशमुख सह आणि मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या तीन विधी संघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेतले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक चिंत्ता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे लोहारा पोलीस ठाणेचे ठाणेदार यशोधरा मुनेश्वर एलसीबीचे स.पो.नि. संतोष मनवर यांच्यासह त्यांच्या पथकांतील योगेश गटलेवार अजय डोळे विनोद राठोड निलेश राठोड प्रशांत हेडाऊ आकाश सहारे मंजुश्री पारखे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. सदर कामगिरीबद्दल लोहारा पोलिसासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पोलीस अधीक्षक अन् अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

No comments