adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रितू खोकर यांनी धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला धाराशिव जिल्ह्यात प्रथमच महिला आयपीएस अधिकारी..!! तर पोलीस अधीक्षक संजय जाधव नियुक्तीच्या प्रतीक्षेत..!

  रितू खोकर यांनी धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला धाराशिव जिल्ह्यात प्रथमच महिला आयपीएस अधिकारी..!! तर पोलीस अधीक्षक संज...

 रितू खोकर यांनी धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला धाराशिव जिल्ह्यात प्रथमच महिला आयपीएस अधिकारी..!! तर पोलीस अधीक्षक संजय जाधव नियुक्तीच्या प्रतीक्षेत..!



 अंजली पुरीगोसावी (धाराशिव जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून. त्यांच्या रिक्त जागेवर सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची  नियुक्ती करण्यात आली असून. त्यांनी शनिवारी मावळते पोलिस अधीक्षक संजय जाधव यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे, राज्यात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकाऱ्यांचे खांदे पलट करण्यात आले आहे महाराष्ट्र पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये धाराशिव आणि रायगड जिल्ह्याची जबाबदारी दोन महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे, रितू खोकर यांना तुळजापूर ड्रगज प्रकरण आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचं आव्हान असणार आहे, रितू खोकर या पाणीपत जिल्ह्यातील रहिवाशी सन 2008 च्या तुकडीतील यूपीएससी उत्तीर्ण उमेदवार आहेत, त्यांचे वडील गावचे माजी सरपंच होते तर धाराशिव चे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना नवीन नियुक्ती मिळालेली नाही त्यांना स्वतंत्रपणे नियुक्ती देणार असल्याचे सरकारकडूंन सांगण्यात आले आहे, आयपीएस अधिकारी रितू खोकर यांच्या नियुक्तीमुळे धाराशिव जिल्ह्याला प्रथमच महिला आयपीएस अधिकारी लाभल्या आहेत

No comments