प्रकाश विद्यालयाचा एसएससी चा ९८% निकाल ; रोहित पाटील प्रथम तर चैत्राली पवार द्वितीय प्रतिनिधी मोहसिन मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गा...
प्रकाश विद्यालयाचा एसएससी चा ९८% निकाल ;रोहित पाटील प्रथम तर चैत्राली पवार द्वितीय
प्रतिनिधी मोहसिन मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मोठे वाघोदा बु।येथील प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज चा इयत्ता दहावीचा निकाल ९८.००% लागला असून रोहित ललित पाटील या विद्यार्थीने ९५.८०% मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला, तर चैत्राली ज्ञानेश्वर पवार ही विद्यार्थीनी ९३.२०% मिळवून द्वितीय आली, तर यशवंत काशिनाथ हतकर हा ९३.००% मिळवून तृतीय आला व मागासवर्गीयातून प्रथम ९१.८०% गुण मिळवून सारिका मनोहर झाल्टे या विद्यार्थीनीने मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री पी. टी. महाजन सर, उपाध्यक्ष श्री श्रावण सिताराम महाजन चेअरमन श्री डी. के. महाजन, व्हा. चेअरमन श्री विजयकुमार बाजीराव पाटील, सचिव श्री किशोर जगन्नाथ पाटील, सहसचिव श्री पी. एल. महाजन व सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक श्री व्ही. एस. महाजन, पर्यवेक्षक श्री आर. पी. बडगुजर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले..

No comments