कु कोमल सपकाळे हिचा दुसखेडा विद्यालयात दुसरा क्रमांक भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : तालुक्यातील दुसखेडा य...
कु कोमल सपकाळे हिचा दुसखेडा विद्यालयात दुसरा क्रमांक
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : तालुक्यातील दुसखेडा या खेडे गावातील एका गरीब कुटूंबातील कु. कोमल संजय सपकाळे हिला इ १० वीला ८७.८० % गुण मिळवून दुसखेडा गावातील शाळेत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे.विशेष म्हणजे कोमल ह्या विद्यार्थीनिच्या घरातील कौटुंबिक परिस्थिती एकदम हलाखिची आहे.तिचे वडील व आई अशिक्षित असून सुद्धा त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणा कडे विशेष लक्ष देऊन कोमल ला जास्तीत-जास्त शिकवून तिला उच्चशिक्षित करायच हे ठरवून टाकले होते तिचे वडील दिपनगर येथे रोजंदारीने काम करतात व तिची आई दुसऱ्यानं च्या शेतात मोलमजुरी करीत असते.आज दहावीचा निकाल दुपारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला होता त्या वेळेस कु.कोमल सुद्धा शेतामध्ये मोलमजुरी करण्यासाठी गेलेली होती ती घरी आल्यावर तिच्या आईने तिला सांगितले कि बेटा तू पास झाली एवढंच सांगितले दुसरं त्यांना त्या व्यक्तीरक्त काही कळतच नाही लागलीच तीने विशालदादा यांना फोन लावला त्या वेळेस तिला सांगितले की तू पास होऊन तुला ८७. ८० % एवढे मार्क मिळाले आहे, तेव्हा तिच्या डोळ्यातुन आनंदाअश्रू निघाले.या तिच्या यशा बद्दल तिचे गावातील पोलीस पोलीस संगीता दांडगे यांनी तिच्या घरी जाऊन तिचा सत्कार व तिला शुभेच्छा दिल्या. तिला नेहमीच सामाजिक कार्यकर्ते, व यावल तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, विशाल दांडगे यांचे मार्गदर्शन लाभते.
स्व.अंजनी दिलीप सूर्यवंशी फाउंडेशन व गीतांजली प्रतिष्ठान दुसखेडा यांच्यातर्फे संस्थेचे अध्यक्ष दिलीपजी सूर्यवंशी सेवानिवृत्त ( डी वाय एस पी ) यांच्या हस्ते दहावीत उत्तीर्ण झालेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय, आलेल्या विद्यार्थ्यांचा दरवर्षीप्रमाणे सत्कार करण्यात येणार आहे. व त्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन सेवानिवृत्त डीवायएसपी दिलीप सूर्यवंशी करणार आहेत.

No comments