वैष्णवी कस्पटे-हगवणे आत्महत्या प्रकरणातील मामा, आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकरांकडून तीन कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अति. कार्यभार काढला..!...
वैष्णवी कस्पटे-हगवणे आत्महत्या प्रकरणातील मामा, आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकरांकडून तीन कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अति. कार्यभार काढला..!
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुण्यातील बहुचर्चेत वैष्णवी कस्पटे हगवणे हुंडाबळी प्रकरणात विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडील नाशिक संभाजीनगर व नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अति: कार्यभार काढला आहे, जालिंदर सुपेकर हे वैष्णवी कस्पटे हगवणे यांचे मेहुणे म्हणजेच शशांक हगवणे यांचे मामा होते, हगवणे कुटुंबीय यांच्या दबावामुळे हुंडाबळी प्रकरणात संशयित आरोपी असणाऱ्या हगवणे कुटुंबावर कडक कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात होता. विशेषता वैष्णवी चे वडील अनिल कस्पटे यांनीही याप्रकरणी सुपेकरांवर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपेकरांना त्यांचा या प्रकरणात काही संबंध आढळला तर कारवाई करण्याचा इशारा दिला होता, त्या अनुषंगाने आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वातील राज्य गृह खात्याने सुपेकरांकडील नाशिक छत्रपती संभाजीनगर व नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला आहे, वैष्णवी कस्पटे हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे आणि हगवणे कुटुंबाचे मामा असणारे आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकरांना चांगलाच दणका बसला आहे, जालिंदर सुपेकर हे आता महाराष्ट्रांच्या पोलीस प्रशासनातच नव्हे तर महाराष्ट्रांत चर्चेत आले आहेत, आत्महत्येशी आणि पिस्तूल परवाना देण्या संदर्भात माझा कोणताही संबंध नाही असे सुपेकर यांनी यापूर्वी सांगितले होते, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया पत्रकार परिषदेत कारागृह साहित्य खरेदी प्रकरणातून नाव वगळावे या संदर्भातील क्लिप देखील ऐकवली होती.
No comments