adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वप्निल सोनार मनसेच्या श्रीरामपूर शहराध्यक्षपदी मनसे च्या संघटनात्मक बांधणीस नवे मोठे बळ

  स्वप्निल सोनार मनसेच्या श्रीरामपूर शहराध्यक्षपदी  मनसे च्या संघटनात्मक बांधणीस नवे मोठे बळ श्रीरामपूर / प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत गा...

 स्वप्निल सोनार मनसेच्या श्रीरामपूर शहराध्यक्षपदी

 मनसे च्या संघटनात्मक बांधणीस नवे मोठे बळ


श्रीरामपूर / प्रतिनिधी :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) श्रीरामपूर शहराध्यक्षपदी स्वप्निल सोनार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून, ही नियुक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच मनसे नेते व अहिल्यानगर जिल्ह्याचे निरीक्षक बाळा नांदगावकर यांच्या सूचनेवरून मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे सदर निवड जाहीर केली आहे. ही नियुक्ती केवळ औपचारिक नसून, संघटनात्मकदृष्ट्या शहरातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या अनुषंगाने श्रीरामपूर सारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि प्रबळ मतदारसंघ असलेल्या शहरात स्वप्निल सोनार यांच्यावर पक्षाच्या शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

स्वप्निल सोनार यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा होताच शहरातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी फटाके फोडून, पेढे वाटून व स्वागताचे कार्यक्रम घेत ही निवड साजरी करण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांनी या निवडीला योग्य आणि भविष्यदृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले. मनसेच्या शहर शाखेने यापूर्वी अनेकदा वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवर आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. स्वप्निल सोनार यांच्यासारख्या कर्मठ आणि झपाटलेल्या कार्यकर्त्याची निवड ही संघटनात नवसंजीवनी देणारी ठरू शकते, असा विश्वास स्थानिक राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर स्वप्निल सोनार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले, "माझ्यावर टाकलेला विश्वास आणि जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. मनसेच्या भूमिकेला योग्य ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी मी वचनबद्ध आहे. श्रीरामपूर शहरातील जनतेच्या प्रश्नांवर आम्ही आंदोलनात्मक आणि रचनात्मक अशा दोन्ही पद्धतीने लढा देणार आहोत." त्यांनी पुढे सांगितले की, "सध्या शहरात अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. पाणीटंचाई, अपुरी आरोग्यसेवा, रस्त्यांची दुरवस्था, वाढती बेरोजगारी, तरुणांमध्ये वाढणारा नैराश्याचा कल याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन एकत्रितपणे कार्ययोजना आखण्यात येईल." पुढे बोलताना ते म्हणाले मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व जिल्हा अध्यक्ष बाबसाहेब शिंदे यांनी दिलेल्या जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडेल व संपूर्ण शहरात पक्ष संघटना नव्याने बांधून येत्या नगरपालिका निवडणुकीत मनसे पक्षाचे उमेदवार निवडून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असे मत नवनियुक्त शहराध्यक्ष स्वप्नील सोनार यांनी व्यक्त केले  

सदर निवड कार्यक्रम श्रीरामपूर येथील मनसे कार्यालय या ठिकाणी पार पडला याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष सतीश कुदळे, जिल्हा संघटक प्रवीण रोकडे,तालुकाध्यक्ष अमोल साबणे, रोजगार सेना तालुकाध्यक्ष भास्कर सरोदे, सहकार सेना तालुकाध्यक्ष निलेश सोनवणे, कामगार सेना तालुका अध्यक्ष विलास पाटणी,विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष संकेत शेलार, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अतुल खरात, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष कुणाल सूर्यवंशी, मनसे शहर सचिव सुजित गायकवाड, शहर उपाध्यक्ष किशोर भागवत, शहर सरचिटणीस नितिन जाधव, शहर उपाध्यक्ष संदीप विशंभर,

महिला सेना शहराध्यक्ष, उज्वला ताई दिवटे, महिला सेना उपशहर अध्यक्ष सुवर्णा ससाने, मनसे शहर उपाध्यक्ष मारुती शिंदे सुरेश शिंदे, मनसे शहर उपाध्यक्ष किशोर भागवत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मिडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments