adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अमळनेर ला रेल्वे मालगाडी रुळावरून घसरली सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक स्थगित, दुरुस्ती कार्य वेगाने

  अमळनेर ला रेल्वे मालगाडी रुळावरून घसरली सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक स्थगित, दुरुस्ती कार्य वेगाने  अमळनेर प्रतिनिधी (संपादक -:- ह...

 अमळनेर ला रेल्वे मालगाडी रुळावरून घसरली

सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक स्थगित, दुरुस्ती कार्य वेगाने 


अमळनेर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अमळनेर: भुसावळ कडून नंदुरबार कडे जाणारी रेल्वे मार्गावरील मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना १५ रोजी प्रताप महाविद्यालयाजवळ दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.  सुदैवाने कोणतीही हानी झाली नसून रेल्वे चे लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित आहेत. डब्बे खाली पडल्याने आजूबाजूचे ट्रॅक देखील खराब झाल्याने सुरत भुसावळ मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रवासी रेल्वेच्या प्रवाश्यांचे हाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . स्टेशन पासून काही अंतरावरच ही घटना घडल्याने तात्काळ अधिकाऱ्यांनी धाव घेतली आणि दुरुस्ती कामाला सुरुवात केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. नेमका अपघात कसा झाला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

No comments