adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

परिवर्तन फाउंडेशन तर्फे यावल बस स्थानकात उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीचे लोकार्पण परिवर्तन फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

परिवर्तन फाउंडेशन तर्फे यावल बस स्थानकात उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीचे लोकार्पण परिवर्तन फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम    भरत कोळी यावल ता.प्रत...

परिवर्तन फाउंडेशन तर्फे यावल बस स्थानकात उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीचे लोकार्पण

परिवर्तन फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम   


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल बस स्थानकात सततच्या होणाऱ्या चोऱ्या आणि माता भगिनींचे दागिने लंपास केल्याच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर समाजाशी आपले काही देणे आहे याची बांधिलकी जोपासून परिवर्तन फाउंडेशन चे संस्थापक युवराज सोनवणे बोरावल गेट यावल यांनी यावल बस स्थानकात पोलीस चौकी उभारून चोरट्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सूचनेनुसार दैनिक देशदूचे तालुका प्रतिनिधी अरुण पाटील यांच्या शुभहस्ते चौकीचे पूजन करून नारळ वाहून लोकार्पण करण्यात आले 

गेल्या दोन-तीन महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत याबाबत यावल पोलिसात गुन्हे ही दाखल आहेत मात्र या ठिकाणी पोलीस नसल्यामुळे चोरट्यांना चांगलेच फावले या गोष्टींचा सारासार विचार करून परिवर्तन फाउंडेशन तर्फे या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आली असून चौकीचे नुकतेच यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय तरुण तडफदार आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या उपस्थितीत व त्यांच्या सूचनेनुसार लोकार्पण दैनिक देशदूत यावल तालुका प्रतिनिधी अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी एसटी आगार (डेपो) व्यवस्थापक  डी बी महाजन यांनी आमदार अमोल हरिभाऊ जावडे भाजपा तालुका अध्यक्ष सागर कोळी परिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज सोनवणे यांचा पुष्पगुच्छ,शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला   

यावल एसटी आगारात आता पोलीस चौकी उभारण्यात आली आहे या चौकीमध्ये सतत एक महिला व एक पुरुष पोलीस कर्मचारी यांना  बंदोबस्त ठेवण्यात संदर्भात आपण पोलीस निरीक्षक सह जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्र लिहून या ठिकाणी कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त कसा राहील व चोऱ्यांना कसा आळा बसेल यासाठी त्वरित कळवतो व प्रवाशांची गैरसोय होणार नाही यासाठी आपण निश्चित प्रामाणिकपणा आणि कार्यतत्पर कामगिरी करूया असे सर्वांच्या समोर आमदार अमोल जावळे यांनी आश्वासित केले प्रारंभी बस डेपो व्यवस्थापक डीबी महाजन यांनी आभार मानले

No comments