राहत्या घरामध्ये गांजा विकणारा पकडला स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि१६):- ...
राहत्या घरामध्ये गांजा विकणारा पकडला स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि१६):- पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव रोड येथील गांजा विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत आरोपीकडून 27 हजार 160/-रू किंमतीचा 1 किलो 358 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.दि.15 मे 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती काढत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, इसम नामे सोमनाथ लक्ष्मण फतपुरे (रा.कोरडगाव रोड, पाथर्डी) हा त्याचे राहते घरामध्ये अंमली पदार्थ गांजा विक्री करत आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी,शेवगाव उपविभाग यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात व पोलीस अंमलदार तसेच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार लक्ष्मण पोटे व विनोद मासाळकर अशांचे संयुक्त पथक तयार केले.पथक पंच व आवश्यक साधनासह माहितीप्रमाणे पाथर्डी ते कोरडगाव जाणारे रोडलगत जाऊन एका घरामधील इसमास पोलीस पथक व पंचाची ओळख सांगुन सोमनाथ लक्ष्मण फतपुरे, वय 48, रा.रामगीरबाबा टेकडी, कोरडगाव रोड,पाथर्डी, ता.पाथर्डी,जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.पंचासमक्ष त्याचे घराची झडती घेतली असता घरामधुन एका पिशवीत असलेला 27,160/- रू किंमत त्यात 1 किलो 358 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा जप्त करण्यात आला.ताब्यातील आरोपीकडे मिळालेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता त्याने काहीएक माहिती सांगीतली नाही.ताब्यातील आरोपीविरूध्द पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 541/2025 एनडीपीएस ऍ़क्ट कलम 8 (क), 20 (ब) (ii) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक,श्री.सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार विश्वास बेरड, अतुल लोटके,संतोष खैरे, शिवाजी ढाकणे,भगवान थोरात व सारिका दरेकर यांनी केलेली आहे.

No comments