चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दित २,२०,०००/- रुपये किंमतीचा ओला गांजा पकड़ला ; आरोपीला अटक चोपड़ा (प्रतिनिधी) (संपादक -:- हेमकांत गाय...
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दित २,२०,०००/- रुपये किंमतीचा ओला गांजा पकड़ला ; आरोपीला अटक
चोपड़ा (प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सत्रासेन ते लासूर रोडवर चोपड़ा ग्रामीण पोलिस हद्दित ओला गांजा बाळगतांना मिळुन आल्याने आरोपी यास मोठ्या शिताफिने अटक करण्यात आले.
सविस्तर असे की,दि.१५/०५/२०२५ गु.र.न. १६०/२०२५ गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे अधिनियम १९८५ चे कलम २०(ब),२२ प्रमाणे पो.हे.को विलेश विश्वासराव सोनवणे यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आले. २,२०,०००/- रुपये किंमतीचा,फुल बियाचा पाकळी असलेला,हिरवट रंगाचा ओलसर गांजा एक पांढरी लाल पिवळ्या रंगाचे प्लॅस्टीक गोणीमध्ये मिळुन आलेला सदर आरोपी संदिप मांगीलाल मेहता(बारेला)वय १९ वर्षे,रा.बलवाडी जवळ चिखली तांडा,ता.वरला,जि.बडवाणी (मध्य प्रदेश) हा इसम दि.१५/०५/२०२५ रोजी लासूर ता चोपडा कमळजा माता मंदिरा जवळ सत्रासेन ते लासूर रोडवर गांजा बाळगतांना मिळुन आल्याने आरोपीला अटक करण्यात आली वजन १० किलो मिळुन आले. मिळून आलेल्या १ किलो गांजाची किंमत २२,०००/- रु तसेच
१,५०,०००/- एक लाल काळया रंगाची बजाज कंपनीची पल्सर तिचा क्रं, एम पी -४६-झेड बी - ८३७६ आरोपी याचे ताब्यात मिळून आली असा एकूण ३,७०,०००/-रु एकूण किंमतिचा माल हस्तगत करण्यात आले.चोपडा ग्रा.पो.स्टे पो.नि कावेरी कमलाकर यांच्या टीमने ही कारवाई केली.
No comments