adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हातेड पेट्रोल पंपाजवळ दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील चौघांना अटक..३लाख २३हजारांचा मुद्देमाल जप्त

हातेड पेट्रोल पंपाजवळ दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील चौघांना अटक.. ३लाख २३हजारांचा मुद्देमाल जप्त  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड...

हातेड पेट्रोल पंपाजवळ दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील चौघांना अटक..

३लाख २३हजारांचा मुद्देमाल जप्त 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

चोपडा (दि.२८) तालुक्यातील हातेड-गलंगी रस्त्यावरील युग पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास चार जण दरोडा टाकण्याच्या इराद्याने असताना ग्रामीण पोलिसांनी चोख कामगिरी बजावत चौघांना अटक केली असून ३लाख २३हजाराचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती अशी की दिनांक 28 /5 /2025 रोजी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास हातेड बुद्रुक गावाच्या हद्दीत युग पेट्रोल पंपांजवळ चार जण संशयित हालचाल करीत असल्याच्या गुप्त माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून  सोनू चक्कर चव्हाण (वय25) यशवंत निराधार पवार (वय42) धर्मा चिमन भोसले (वय 40) भरत निराधार पवार (वय38) सर्व राहणार जामदे, तालुका साक्री जिल्हा धुळे यांना ताब्यात घेतले असता यांच्याकडून दरोडा टाकण्याचे साहित्य मिरची पूड 79 धातूच्या पट्ट्या काळा रंगाची बॅग मोटार सायकली व मोबाईल असा तीन लाख 23 हजाराचा मुद्देमाल म्हणून आला आहे. हे चौघे मोठा दरोडा टाकण्याचे इराद्यात असल्याने पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने पुढील मोठा अनर्थ ठरला आहे 

या घटनेतील आरोपींकडून 245ग्रॅम, 250 ग्रॅम लाल मिरची पावडर 19 पिवळ्या धातूच्या पट्ट्या काड्या रंगाची बॅग रियल मी कंपनीचा 14 प्रो मोबाईल, विवो कंपनीचा 290 आकाशी रंगाचा मोबाईल, ओपो कंपनीचा ए थ्री एक्स चॉकलेटी रंगाचा मोबाईल, मोटोरोला ईडीजी 50 हिरव्या रंगाचा मोबाईल, केटीएम कंपनीची लाल रंगाची मोटर सायकल, क्रमांक एम एच 18 सीडी 8871, होंडा कंपनीची युनिकॉन, मोटरसायकल क्रमांक एम एच 18 बियु 64, असा मुद्देमाल मोडून आलेला आहे 

याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात सी सी टी एन  एस गु गु र नं. 169/ 2025बीएन एस कलम 310 (4)प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप,पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी भेट दिली असून पुढील तपास सपोनि नितीन नितनवरे हे  करीत आहे.

No comments