adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आठ बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या...!

आठ बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या...!   संभाजी पुरीगोसावी (मुंबई) प्रतिनिधी.  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महाराष्ट्रात सध्या आता पोलीस ...

आठ बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या...! 


संभाजी पुरीगोसावी (मुंबई) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्रात सध्या आता पोलीस खात्यातील बदल्यांचे सूत्र सुरू झाले असून, मागीलच आठवड्यात 6 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, त्यानंतर पुन्हा मंगळवारी राज्य गृह विभागाने आठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांना राज्य गुप्तवार्ता विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक तर राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सह आयुक्त शारदा वसंत निकम यांना अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षक तर नागपूरचे सह आयुक्त निसार तांबोळी यांना नागपूरच्याच राज्य राखीव पोलीस दलाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक तर अमरावतीचे पोलीस आयुक्त एन.डी रेड्डी यांना नागपूर शहरांचे सह आयुक्त पदावर तर केंद्रीय प्रति नियुक्तीवरून आलेल्या सुप्रिया यादव पाटील यांच्याकडे महाराष्ट्र राज्य पोलीस आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक तर राज्य राखीव पोलीस दलाचे विशेष महानिरीक्षक राजीव जैन सागरी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदाची जबाबदारी तर मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे यांची बदली प्रशासन विभागात विशेष महानिरीक्षक म्हणून करण्यात आली तर आरती सिंह यांचीही बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या बदलीचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत. पोलीस खात्यातील अजून काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या होतील अशी ही माहिती राज्य गृह विभागाकडून मिळाली आहे

No comments