adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ.शिवचरण उज्जैनकर यांचा विदर्भ दौरा यशस्वी उज्जैनकर फाउंडेशनच्या अमरावती व अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची सदिच्छा घेतली भेट

  डॉ.शिवचरण उज्जैनकर यांचा विदर्भ दौरा यशस्वी उज्जैनकर फाउंडेशनच्या अमरावती व अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची  सदिच्छा घेतली भेट इदू पिंजार...

 डॉ.शिवचरण उज्जैनकर यांचा विदर्भ दौरा यशस्वी

उज्जैनकर फाउंडेशनच्या अमरावती व अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची  सदिच्छा घेतली भेट


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दिनांक १८ मे २०२५ रविवार रोजी विवाह सोहळ्या प्रसंगी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर,कार्यकारिणीच्या खजिनदार सौ. संगीता उज्जैनकर, डॉ.उज्जैनकर यांचे सासरे  राजधरशेठ बुडूखले, फाउंडेशनचे अकोला जिल्हा संपर्कप्रमुख निलेशजी सोनी,डॉ. उज्जैनकर यांचे व्याही   मनोहरराव सोनी तथा डॉ. उज्जैनकर यांच्या कन्या सौ.दिपाली बुडूखले , नातू चि.आरव, सौ.लताबाई मुंधोकार ,  श्री गणेश बुडूखले सौ.सविता बुडूखले, डॉ. उज्जैनकर यांचे खामगाव येथील व्याही तथा फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा समन्वयक  बाळूभाऊ ईटणारे त्यांच्या सौभाग्यवती सौ.आशाबाई ईटनारे आदी आप्तेष्ट या प्रसंगी उपस्थित होते या वेळी चिखलदरा, मेळघाट, परिसराचा सर्वांनीच वनखात्याच्या मोकळ्या जीप मधून जंगल सफर केली आणि चिखलदरा निसर्गरम्य परिसराचा  मनमुराद आनंद घेतला या जंगलात कोल्हे, रान डुक्कर, गवा, मोर, सांबर, हरण, रान कुत्रे, आदी प्राण्यांचे दर्शनही झाले. या प्रसंगी भीमकुंड, गाविलगड, मोझरी, विदर्भातील 

    त्यानंतर दि.  19 मे रोजी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी अमरावती येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी फाउंडेशनच्या राज्य संपर्कप्रमुख तथा मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावतीच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मंदाताई नांदुरकर यांच्या काँग्रेस नगर येथील निवासस्थानी भेट दिली असता याप्रसंगी त्यांनी त्यांचे फुलकई हे बालकाव्याचे पुस्तक डॉ. उज्जैनकर यांना सप्रेम भेट दिले.याप्रसंगी त्यांच्या मातोश्री दुर्गाबाई नांदुरकर ,डॉ.उज्जैनकर यांचे आतेभाऊ  सुनील सावरकर ,चि. निखिल सावरकर चि. प्रज्वल सावरकर आदी उपस्थित होते त्याचप्रमाणे फाउंडेशनचे राज्य संघटक प्रा. आनंद महाजन यांच्या निवासस्थानी सुद्धा डॉ. उज्जैनकर यांनी सदिच्छा भेट दिली 

         त्याचप्रमाणे दि. २१ मे रोजी अकोला येथे फाउंडेशनच्या विदर्भ विभागीय उपाध्यक्षा प्राचार्या डॉ .लताताई थोरात यांच्या राम नगर येथील निवास स्थानी डॉ. उज्जैनकर यांनी सदिच्छा भेट दिली असता याप्रसंगी फाउंडेशनचे राज्य संपर्कप्रमुख डॉ.अशोकजी शिरसाठ राज्य सल्लागार तथा ज्येष्ठ साहित्यिक तुळशीरामजी बोबडे , फाउंडेशनच्या अकोला जिल्हा उपाध्यक्षा प्रा. डॉ. शिल्पाताई देशमुख, फाउंडेशनच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षा पूजाताई खेते आदींनी उज्जैनकर यांचा गुलाब बुके देऊन सत्कार केला.तसेच या प्रसंगी डॉ.अशोक शिरसाट हे वयाच्या 61 व्या वर्षी संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती मधून जर्नालिझम या विषयात 72  टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. त्याचप्रमाणे  तुळशीराम बोबडे साहेब यांनी पातुर येथील 62 व्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचे  अध्यक्षपद भूषविल्याबद्दल त्या दोघा पदाधिकाऱ्यांचा डॉ. उज्जैनकर व पदाधिकाऱ्यांनी गुलाब बुके देऊन सत्कार केला. प्रसंगी उज्जैनकर फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून फाउंडेशनच्या पुढील संमेलना विषयी चर्चा करण्यात आली.

No comments