चोपडा महाविद्यालयात एमबीए व एमसीए अभ्यासक्रमास मान्यता: ॲड.संदीप पाटील चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा : येथील महात्मा...
चोपडा महाविद्यालयात एमबीए व एमसीए अभ्यासक्रमास मान्यता: ॲड.संदीप पाटील
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय या नॅक द्वारे A+ ग्रेडने नामांकीत महाविद्यालयात अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद,नवी दिल्ली (एआयसीटीई) यांचेकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी व्यवस्थापन विद्याशाखे अंतर्गत एमबीए व एमसीए या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.लवकरच महाराष्ट्र शासन व विद्यापीठाचे संलग्नीकरण प्राप्त होऊन या शैक्षणिक वर्षापासून चोपडा तालुका व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना व्यवस्थापन विद्याशाखे अंतर्गत एमबीए व एमसीए अभ्यासक्रमास प्रवेश उपलब्ध होतील.विद्यापीठ परिक्षेत्रात कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात एमबीए व एमसीए अभ्यासक्रमास मान्यता मिळणारे एकमेव महाविद्यालय असल्याने याचा मनस्वी आनंद होत आहे.दोन्ही अभ्यासक्रमांसाठी ६०-६० विद्यार्थ्यांची तुकडी मंजूर करण्यात आलेली आहे.या सर्व अभ्यासक्रमांच्या उपलब्धतेसाठी संस्थेचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील,सचिव डॉ.स्मिता संदीप पाटील यांनी अनमोल मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी,समन्वयक डॉ.शैलेश वाघ,उपप्राचार्य डॉ.के एन.सोनवणे,एमबीए/एमसीए अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ.अभिजीत साळुंखे,डॉ.दीनानाथ पाटील सर्व उपप्राचार्य,रजिस्ट्रार,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.एमबीए व एमसीए अभ्यासक्रमास मान्यता मिळाल्याने तालुक्यातील विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.अत्याधुनिक व सुसज्ज संगणक प्रयोगशाळा व वर्गासह महाविद्यालय परिसरात स्वतंत्र ५ मजली इमारत प्रस्तुत अभ्यासक्रमांसाठी निर्माण करण्यात आलेली आहे.संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी अभ्यासक्रमास मंजुरी मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले.प्रस्तुत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी,उपप्राचार्य प्रा.के.एन.सोनवणे,प्रा.आर.एम.बागुल,डॉ.ए.बी.सूर्यवंशी,समन्वयक डॉ.एस. ए.वाघ व रजिस्ट्रार डी.एम.पाटील यांनी केले.

No comments