adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गांजा घेवुन येणारा मोटारसायकलस्वार जेरबंद, चोपड़ा शहर पोलिसांची कारवाई

  गांजा घेवुन येणारा मोटारसायकलस्वार जेरबंद, चोपड़ा शहर पोलिसांची कारवाई चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा शहर पोलीस स्टेशन...

 गांजा घेवुन येणारा मोटारसायकलस्वार जेरबंद, चोपड़ा शहर पोलिसांची कारवाई


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात दिनांक २७/०५/२०२५ रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून त्यांनी एक पथक तयार करून चोपड़ा चुंचाळे रोडवरील एम.एस.डब्लु. कॉलेज जवळ  आज दिनांक २७/०५/२०२५ रोजी सकाळी १०-०० वा चे सुमारास सापळा रचून  चुंचाळे गावाकडून कडून चोपड्याकडे येत असलेल्या मोटारसायकल क्रमांक एम पी ४६ एम डब्लू ६५८५ वर येणारा इसम नामे कालुसिंग गोराशा बारेला, वय २६ वर्षे, रा.महादेव, ता शिरपुर, जि धुळे यास ताब्यात घेतले असता त्याच्या मोटारसायकलवर बांधलेल्या गोणीमध्ये १० किलो ६०० ग्रॅम एवढा गांजा मिळून आला असून पोलीस पथकाने जागेवर फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन पाचारण करून त्यातील तज्ज्ञांच्या सहाय्याने सदर गांजाची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे मोटारसायकल व संशयीताकडे मिळून आलेली रोख रक्कम असा एकुण २,३०,२०० रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर इसमाविरुध्द चोपडा शहर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक ३३७/२०२५ एन डी पी एस कायदा कलम ८ (सी) सह २० (बी) (ii) (B), २२ (B) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी महेश्वर रेड्डी,पोलीस अधिक्षक जळगाव, मार्गदर्शनाखाली व अण्णासाहेब घोलप,उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोहेकॉ संतोष पारधी, पोहेकॉ लक्ष्मण शिंगाणे, पोहेकॉ रितेश चौधरी, पोहेकॉ.ज्ञानेश्वर जवागे, पोना संदिप भोई, पोकॉ विनोद पाटील, पोकॉ निलेश वाघ, पोकॉ महेंद्र पाटील यांनी कारवाई केली

No comments